Rahul Gandhi  Esakal
देश

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? कोर्टाने जारी केली नोटीस; एक नोव्हेंबरला होणार सुनावणी

रोहित कणसे

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या अचडणी वाढण्याची शक्यता आहे. लखनऊमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल गुन्ह्याच्या प्रकरणातील याचिका जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अश्विनी कुमार त्रिपाठी यांनी स्वीकारली आहे. यासोबत कोर्टाकडून केरळमधील वायनाडचे लोकसभा खासदार असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस देखील पाठवली आहे. तसेच हे प्रकरण एमएलए कोर्टाच्या विशेष न्यायाथीशांच्या न्यायालयात स्थानांतरित करण्यात आले आहे. आता कोर्टात होणाऱ्या या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल फौजदारी खटला रद्द करण्याच्या कनिष्ठ न्यायालयाचा आदेशाविरोधात जिल्हा आणि सत्र व्यायाधीश अश्विनी कुमार त्रिपाठी यांच्या कोर्टात दाद मागण्यात आली. ही याचिका स्वीकार करत न्यायालयाने राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील लोकांना नोटीस जारी करत याचिका एमपी एमएमए कोर्टाच्या विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयात स्थानांतरित करण्यात आले. या प्रकरणी एक नोव्हेंबर रोजी सुनावणी होईल.

तक्रारकर्ते नृपेंद्र पांडे यांनी राहुल गांधी यांच्यावर आरोप करत मुख्य न्याय दंडाधिकारी तृतीय यांच्याकडे एक तक्रार दाखल केली होती. यामध्ये विरोधकांकडून भारत जोडो यात्रेत विनायक दामोदर सावरकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे म्हटले होते. राहुल गांधी यांनी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील अकोला येथे जाणीवपूर्वक सावरकरांविरोधात भाष्य केल्याचा आरोप करण्यात आला होता.

कनिष्ठ न्यायालयाने प्रथम हा अर्ज तक्रार म्हणून दाखल करण्याचे आदेश दिले, परंतु नंतर ही तक्रार अधिकारक्षेत्राबाहेर असल्याचे सांगत फेटाळण्यात आली. दरम्यान कनिष्ठ न्यायालयाच्या या आदेशाला देखरेख याचिकेद्वारे (monitoring petition) आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांसाठी मोठी संधी; लघु उद्योगांना पंतप्रधान मोदींचे आवाहन

Mumbai Local Megablock: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! रविवारी लोकल उशिराने धावणार, 'या' मार्गावर मेगाब्लॉक; कसे असेल नियोजन?

Koyna Dam Water Level : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' 100 टीएमसीच्या उंबरठ्यावर! कोयना धरणात 97 टीएमसी पाणीसाठा; सांगली-सातारा अन् कर्नाटकाची चिंता मिटली

IND vs SL: भारत खेळणार 600वा कसोटी सामना; ‘या’ दोन संघांनंतर ऐतिहासिक क्लबमध्ये होणार एंट्री, कोणत्या देशाने खेळले 1000हून अधिक सामने!

Vishwas Nangare Patil: विश्‍वास नांगरे पाटील यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक, रेड्डींसह दहा पोलिस होणार सन्मानित

SCROLL FOR NEXT