Novavax Vaccine Authorized in India esakal
देश

Novavax च्या कोविड लसीला भारतात मान्यता

सकाळ डिजिटल टीम

कोराना लसीकरणात आघाडीवर असलेल्या भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.

नवी दिल्ली : कोराना लसीकरणात (Covid-19) आघाडीवर असलेल्या भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. नोव्हावॅक्सच्या (Novavax) कोरोना लसीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिलीय. ही लस 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांना दिली जाईल. नोव्हावॅक्सची ही लस NVX-CoV2373 म्हणूनही ओळखली जाते. भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India, SII) ही लस बनवत आहे. भारतात ही लस Covovax या नावानं ओळखली जाईल.

Covovax ही देशातील चौथी अशी लस आहे, जी भारतात 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना दिली जाणार आहे. याआधी भारतात बायोलॉजिकल E's Corbevax, Zydus Cadila's ZyCoV-D आणि Bharat Biotech's Covaccine ही 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांवर वापरली जात होती.

Covovax चा 80 टक्के प्रभाव

नोव्हावॅक्सनं गेल्या महिन्यात सांगितलं होतं की, त्यांची लस 80 टक्के प्रभावी आहे. भारतात 12 ते 17 वर्षे वयोगटातील 2,247 मुलांवर या लसीची चाचणी घेण्यात आली. नोव्हावॅक्सच्या लसीला 'Covovax' गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच मंजुरी देण्यात आली होती. पण, तेव्हा ही मान्यता केवळ 18 वर्षांवरील लोकांसाठी होती. Covovax ला नुकतीच जागतिक आरोग्य संघटनेकडूनही आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळालीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT