now aarogya Setu users can generate unique health id ayushman bharat health account number check details  
देश

आरोग्य सेतू ॲपवरुन तयार करता येईल युनिक हेल्थ आयडी, वाचा डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

भारतात कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी आरोग्य सेतू मोबाइल ॲप (Aarogya Setu app) सरकारकडून लॉन्च करण्यात आले होते. जर तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप असेल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह लोकांचीही माहिती घेऊ शकतात. केंद्र सरकारने शुक्रवारी जाहीर केले की आरोग्य सेतू ॲपचे सर्व वापरकर्ते आता यूनिक आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक तयार करू शकतील .

आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) ने सध्या 16.4 कोटी नागरिकांनी ABHA क्रमांक तयार केले आहेत आणि आरोग्य सेतू ॲप हे आणखी वाढविण्यात मदत करेल, असे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) एका निवेदनात म्हटले आहे.

आरोग्य सेतू ॲपवरुन आता वापरकर्ते 14-अंकी य़ूनिक आयुष्मान भारत आरोग्य खाते (Ayushman Bharat Health Account) क्रमांक तयार करू शकतील. ते त्यांचे सध्याचे आणि नवीन मेडिकल रेकॉर्ड एकत्र जोडण्यासाठी ABHA क्रमांक वापरू शकतात असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Health and Family Welfare) कडून सांगण्यात आले आहे.

या योजनेचा भाग म्हणून 21.4 कोटींहून अधिक वापरकर्ते त्यांचा युनीक ABHA क्रमांक तयार करू शकतात आणि ABHA नंबरचा वापर डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, प्रयोगशाळेतील अहवाल, हॉस्पिटल रेकॉर्ड इत्यादींसह त्यांचे सध्याचे आणि नवीन मेडिकल रेकॉर्ड लिंक करण्यासाठी करू शकतात. तसेच हेच रेकॉर्ड रजिस्टर्ड हेल्थ प्रोशेशनल आणि आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थाना देखील उपलब्ध असेल.

ABHA क्रमांक कसा तयार करायचा

वापरकर्ते त्यांचा आधार क्रमांक आणि काही मूलभूत डेमोग्राफिक डिटेल्स जसे की नाव, जन्म वर्ष (किंवा जन्मतारीख), लिंग आणि पत्ता (आधार OTP द्वारे वापरकर्त्याने व्हेरिफाय केल्यावर) वापरून त्यांचा ABHA क्रमांक जनरेट करू शकतात.

जर वापरकर्त्याला त्यांचा आधार नंबर वापरायचा नसेल, तर ते ABHA क्रमांक तयार करण्यासाठी त्यांचा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मोबाइल नंबर वापरू शकतात. ABHA क्रमांक https://abdm.gov.in/ किंवा ABHA अॅपवरून तयार केला जाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT