Competitive Exam sakal
देश

UGC NET, CSIR-UGC NET च्या कधी होणार परीक्षा? NTA कडून नव्या तारखा जाहीर

UGC NET CSIR UGC NET: रद्द आणि पुढे ढकलण्यात आलेली UGC-NET परीक्षा आता २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत होणार आहे. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अनियमितता झाल्यावरून वाद निर्माण झाला असताना एनटीएने National Testing Agency (NTA) शुक्रवारी रात्री UGC-NET परीक्षेसाठीची नवी तारीख जाहीर केली आहे. रद्द आणि पुढे ढकलण्यात आलेली UGC-NET परीक्षा आता २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत होणार आहे. संयुक्त CSIR UGC NET परीक्षा २५ जुलै ते २७ जुलै दरम्यान घेण्यात येईल. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

UGC-NET परीक्षा याआधी १८ जून रोजी घेण्यात येणार होती पण, एक दिवस आधी शिक्षण मंत्रालयाने ही परीक्षा रद्द करण्यात निर्णय घेतला होता. परीक्षांचे पेपर लीक झाल्याच्या संशयावरून मंत्रालयाने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं होतं की, पेपर डार्कनेटवर लीक झाले होते आणि टेलिग्रामवर शेअर केले जात होते.

१८ जूनला होणारी नेट परीक्षा ३१७ शहरांमध्ये होणार होती. यासाठी ९ लाख विद्यार्थी परीक्षा देणार होते. पण, अचानक एक दिवस आधी परीक्षा रद्द झाल्याने त्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले होते. सध्या देशात नीट, नेट परीक्षांमधील अनियमिततेवरून वाद सुरु आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. संसदेत सुद्धा याचे पडसाद उमटल्याचं दिसत आहे. अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. एकंदरीत पेपरफुटीचं प्रकरण देशभरात गाजत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Incident: 180 प्रवाशांचा जीव... '9/11' सारख्या हल्ल्याचा धोका; फ्लायदुबईच्या भारतीय कॅप्टनमुळे टळला मोठा अपघात, नेमकं काय घडलं?

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ठाण्यात तणाव; आदित्य ठाकरे, संजय राऊत कापूरबावडी पोलिस ठाण्यात

Pune Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव टँकरचा थरार; दुचाकीला धडक देऊन चालक फरार, २१ वर्षीय तरुण ठार

Latest Marathi News Live Update : शेखर गोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

SCROLL FOR NEXT