corona-india 
देश

देशभरातील कोरोना रुग्णांचा आकडा ११ लाखांच्यावर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली -  देशभरातील कोरोनाचा संसर्ग संपण्याची चिन्हे नाहीत. लागोपाठ तिसऱ्यांदा केवळ तीन दिवसांत रुग्णसंख्या एक लाखांनी वाढली आहे. त्यामुळे देशभरातील कोरोना रुग्णांचा आकडा ११ लाखांच्यावर गेला आहे. 

प्रत्येक दहा लाख लोकसंख्येतील ७८७ लोक कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. देशामध्ये ३० जानेवारी रोजी पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. त्यानंतर ११० दिवसांनी म्हणजेच १० मे रोजी ही संख्या एक लाखावर गेली होती. त्यानंतर १५ दिवसांत रुग्णांचा आकडा दोन लाखांवर पोहोचला होता. त्यानंतर रुग्णसंख्या दोन लाखांहून तीन लाख होण्यासाठी दहा दिवस लागले होते. तर तीन लाख ते चार लाख रुग्णसंख्या केवळ आठ दिवसांत गेली होती. त्यानंतर रुग्णसंख्या वाढीचा वेग चढाच होता. सात लाख रुग्णसंख्येवरून आठ लाख रुग्णसंख्या होण्यासाठी केवळ चार दिवस लागले होते. त्यानंतर प्रत्येक तीन दिवसांनी एक-एक लाखांनी रुग्णसंख्या वाढली आहे आणि केवळ नऊ दिवसांत रुग्णसंख्या आठ लाखांहून ११ लाखांवर गेली आहे. 

रुग्णसंख्या वाढीच्याबाबतीत भारत अमेरिकेपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात आतापर्यंत एक कोटी ३४ लाख लोकांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी ८,०२ टक्के लोकांना संसर्ग झाला आहे. अमेरिकेत चार कोटी लोकांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी ८,.०५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. सर्वांत वाईट स्थिती ब्राझीलची आहे. तेथे केवळ ४९ लाख लोकांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी ४३.२५ टक्के लोकांना संसर्ग झाला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्रात उच्चांकी वाढ 
राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच दिवसभरात ९५१८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या ३,१०,४५५ इतकी झाली आहे. तर राज्यात दिवसभरात २५८ जणांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यात आज ३९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.६२ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ६९ हजार ५६९ झाली आहे. दरम्यान, सध्या राज्यात १ लाख २८ हजार ७३० रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १५ लाख ६४ हजार १२९ नमुन्यांपैकी ३ लाख १० हजार ४५५ नमुने पॉझिटिव्ह (१९.८५ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ५४ हजार ३७० लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ८४६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 

राज्यात आज २५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.८२ टक्के एवढा आहे. सर्वाधिक ६४ जणांचा मृत्यू मुंबईत झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग लागू होण्यास उशीर? कर्मचाऱ्यांना 3 लाखांचं नुकसान; काय आहे गणित?

Kolhapur DCC Bank Election : गोकुळपाठोपाठ कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी; 732 ठराव रद्द, कोणत्या गटात किती मतदार?

भन्नाट... भुवनेश्वर कुमार भारतीय संघात परतला; कृणाल पांड्या, नितीश राणा यांनाही संधी, जाणून घ्या केव्हा व कुठे होणार स्पर्धा...

'आई कुठे काय करते' मालिकेतून अचानक काढून टाकलं; लोकप्रिय लेखिकेचा मोठा खुलासा; मला काही येत नव्हतं असं...

SCROLL FOR NEXT