देश

Coronavirus : देशात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ; आता...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चीनमधून सुरुवात झालेला कोरोना व्हायरस युरोप, अमेरिका आणि आता जगभरात धुमाकूळ घालत आहे. सध्या भारतातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भारतात आत्तापर्यंत 727 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. 

संपूर्ण जगात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. यापूर्वी चीनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यानंतर इटलीमध्ये याचा फैलाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. मात्र, आता या दोन्ही देशानंतर अमेरिकेत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक झाली आहे. इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत सर्वाधिक 85,435 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत.

तसेच कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानुसार आता याची अंमलबजावणी होताना दिसत आहे. मात्र, तरीदेखील सध्या भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच आहे. तसेच यातील मृतांची संख्याही वाढत आहे. सध्या ७२७ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यामध्ये २० कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सर्वाधिक

विविध राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची सख्या वाढत आहे. मात्र, महाराष्ट्रात याचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात आत्तापर्यंत १२४ रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये सध्या वाढ होत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आजचे राशिभविष्य - 28 ऑक्टोबर 2026

Sprouts Thalipeeth: मोड आलेली कडधान्यं आणि गव्हाचं पीठ, कमी साहित्यात बनवा पौष्टिक थालीपीठ; मुलांच्या डब्यासाठीही उत्तम!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 28 ऑक्टोबर 2026

FDA Crime : बीडमध्ये आरोग्याशी खेळणाऱ्या ‘झम झम’ कारखान्यावर एफडीएचा दणका! ७ हजार बाटल्यांसह पावणेदोन लाखांचा माल जप्त

शनीच्या नक्षत्र बदलामुळे ५ राशींचं नशीब पालटणार! पुढचे १०४ दिवस ठरणार खास

SCROLL FOR NEXT