देश

Coronavirus : देशभरात कोरोनाचे थैमान सुरुच; आत्तापर्यंत...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना व्हायरस अमेरिका, चीन, भारत, युरोप, फ्रान्स, इटलीसह आता जगभरात थैमान घालत आहे. भारतातही रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशात आत्तापर्यंत 74,292 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 2,415 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला.

कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन 4.0 ची घोषणा केली आहे. त्यानुसार आता नव्या नियमावलीसह येत्या 18 मेपासून लॉकडाऊन सुरु केला जाणार आहे. 'वर्ल्ड मीटर्स'नुसार जगभरात 43,42,355 कोरोनाची प्रकरणं समोर आली आहेत. यामध्ये 2,92,893 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तसेच देशभरात सध्या 74,292 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2,415 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत 24,420 कोरोनाग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुग्णांवर उपचार सुरु

भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 74 हजार पार गेला आहे. देशात 74,292 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. यापैकी तब्बल 24,420 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर यामध्ये 2,415 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशभरात 47,457 ऍक्टिव्ह केसेस आहेत.     

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सर्वाधिक

देशातील विविध राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, महाराष्ट्रात याचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 24,427 हून अधिक रुग्णांची नोंद झाली असून, 921 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुंबईत वाढतीये कोरोनाबाधितांची संख्या

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईतील असल्याची माहिती देण्यात येत आहे. काल 1,026 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. तर 53 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 28 रुग्ण हे मुंबईतील असल्याची माहिती देण्यात येत आहे.  

दिल्लीतील रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण

वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यानंतर आता दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबडेकर रुग्णालयातील 106 कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. हा दिल्लीतील सर्वात मोठा आकडा आहे.

42000 स्थलांतरित कामगार परतणार आपल्या गावी

राज्यात अडकलेले 42000 स्थलांतरित कामगार 35 रेल्वेगाड्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातून आपापल्या गावी परतत आहेत, अशी माहिती दिली जात आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT