देश

भारतात आत्तापर्यंत 52,952 नागरिकांना कोरोनाची लागण; मृतांचा आकडा 1783 वर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशभरातील कोरोनाबाधितांची रुग्णांची संख्या आता 52 हजार 952 वर गेली आहे. तर आत्तापर्यंत 1783 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील विशेष बाब म्हणजे 15,266 रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा यांसह विविध राज्यांत रुग्णसंख्या मोठी आहे. त्यामुळे भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी यांच्यासह देशात 548 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. परंतु प्रत्यक्ष आरोग्य तपासणी करणारे कर्मचारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्वच्छता कर्मचारी, वॉर्डबॉय, सुरक्षारक्षक, शिपाई, स्वयंपाक कर्मचारी यांच्या माहितीचा यामध्ये समावेश नाही.

दरम्यान, या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण नेमकी कशामुळे झाली, याची माहितीही अद्याप समजू शकली नाही.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा करणार

महाराष्ट्रातील 36 पैकी 34 जिल्हे कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे ही परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करता येईल, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले.

15 हजारहून अधिक रुग्णांवर उपचार

आत्तापर्यंत 15 हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात वाहतुकीत मोठे बदल, अनेक रस्ते बंद; पर्यायी मार्ग कोणते? खरेदीला गेल्यावर पार्किंग कुठे करायचं? वाचा सविस्तर अपडेट्स

Viral Video: डीजेचा दणदणाट नव्हता, लेझीम-टिपरीचा जल्लोष होता; पाहा १९९१ मधील पुण्याची पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणूक

Jat Municipality Photo Dispute : जत पालिकेची सभा छायाचित्राच्या वादात; मुख्यमंत्री-आमदारांच्या फोटोवरून जोरदार खडाजंगी, काँग्रेसचा सभात्याग

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Borkhind Samruddhi Highway Interchange : नाशिकला समृद्धी महामार्गाचा थेट फायदा! बोरखिंड इंटरचेंजला मुख्यमंत्र्यांची मंजुरी, 343 कोटींचा निधी जाहीर

SCROLL FOR NEXT