india-corona 
देश

भारतात रुग्ण संख्येचा आलेख चढाच; भारत रशियाला मागे टाकणार 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या सहा लाखांपेक्षा जास्त झाली आहे. केवळ पाच दिवसांत पाच लाखांवरून आकडा सहा लाखांवर पोचला आहे. संसर्ग झालेल्यांची संख्या २६ जून रोजी पाच लाख झाली होती. देशात कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारीला आढळला होता. त्यानंतर ११० दिवसांत म्हणजे १० मे रोजी एक लाख रूग्ण संख्या होती. 

भारत रशियाला मागे टाकणार 
संसर्गाचा वेग एवढा वाढला की १० मे नंतर केवळ १५ दिवसांत ही संख्या दोन लाखांवर गेली. दोन लाखांवरून तीन लाखांचा टप्पा केवळ दहा दिवसांत गाठला तर त्यानंतरच्या आठ दिवसांत नवे एक लाख बाधित आढळून रुग्ण संख्या चार लाखांवर पोचली. हा आलेख वाढत राहिल्याने सहा दिवसांत पाच लाख तर त्यानंतरच्या पाच दिवसात भारतातील एकूण रुग्ण सहा लाख रुग्ण झाले आहेत. म्हणजेच प्रत्येक पाच दिवसांत नवे एक लाख रुग्ण तयार झाले आहेत. असाच वेग वाढत राहिला तर पुढील तीन-चार दिवसांत भारत रशियाला मागे टाकून जगातील तिसरा सर्वाधिक संक्रमित देश बनेल. 

अमेरिकेत सर्वांत कमी ८६ दिवसांत सहा लाख लोक पॉझिटिव्ह आढळले होते. भारतात १५४ दिवसांत सहा लाख रुग्ण संख्या झाली. 
सहा लाखांचा टप्पा गाठण्यासाठीचा काळ (दिवस) 
-१५४ 
अमेरिका 
सहा लाख रुग्ण 

१०० 
ब्राझील 

१४६ 
रशिया 

१५४ 
भारत 
---------- 
भारतात आधी ११० दिवसांत रुग्ण संख्या एक लाखावर पोचली. आता प्रत्येक पाच दिवसांतच एक लाखाचा आकडा गाठला जात आहे. 
रुग्णसंख्या व दिवस 
५०,००० - ९८ (६ मे रोजी) 
५०,००० - १२ (६ मेनंतर) 
१.५ लाख - ८ 
२ लाख - ७ 
२.५ लाख - ५ 
३ लाख - ५ 
३.५ लाख - ४ 
४ लाख- ४ 
त्यानंतर आत्तापर्यंत प्रत्येत दोन ते अडीच दिवसांत ५० हजार रुग्णांची भर पडत आहे. 

------- 
देशात कोरोनातून बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. १०० रुग्णांमधील ५९ रुग्ण बरे झाले आहेत. 

६ लाख - एकूण रुग्ण 

३.७५ लाख - बरे झालेले रुग्ण 

५९.४० टक्के - बरे होण्याचे प्रमाण 

जगाचा विचार करता रशियात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 
सर्वांत जास्त आहे. भारताचा क्रमांक दुसरा आहे. 
देश, एकूण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (टक्केवारी) 
रशिया - ६.५४ लाख - ६४.६२ 
भारत - ६.२ लाख - ५९.४० 
ब्राझील - १४.२६ - ५५.३६ 
अमेरिका - २७.४५ - ४१ - ६६ 
----------- 
देशातील महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार सर्वाधिक आहे. मेघालयात सर्वांत कमी रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर सिक्कीमचा क्रमांक येतो. तेथे ८८ रुग्ण आहेत. 
रुग्णसंख्येचे प्रमाण (टक्क्यांत) 
२९.९४  महाराष्ट्र 

१५. ६२ तमिळनाडू 

१४.९१ दिल्ली 
--------- 

देशात आत्तापर्यंत १७ हजार ७८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
मृतांचे प्रमाण (टक्क्यांत) 

४५. २७  महाराष्‍ट्र 

१५. ७५  दिल्ली 

१०.३९  गुजरात 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: न्यूझीलंडच्या सलमीवीरांनी वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकला सामना; स्पर्धेत्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

Video Viral: दुचाकीस्वारासह उचलली गाडी; पुण्यातला टोइंग व्हॅनचा व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष पदावरून युतीत तानातानी?

मनवा नाईक पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत; 'या' प्रसिद्ध निर्मात्यासोबत मिळून करणार धमाका

Ajit Pawar Plane crash: रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांच्या नावाचा उल्लेख का केला? 'त्या' दोन कंपन्यांपैकी एक पटेलांची

SCROLL FOR NEXT