देश

भारतातील कोरोनाबाधितांची संख्या ८८ लाखांच्या वर

पीटीआय

नवी दिल्ली - भारतातील कोरोनाबाधितांची संख्या ८८ लाखांच्या वर गेली आहे. त्याचबरोबर बरे झालेल्या रुग्णांची संख्याही ८२ लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ९३.०९ टक्के झाला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. 

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सलग पाचव्या दिवशी पाच लाखांच्या खाली होती. ‘आयसीएमआर’ने दिलेल्या माहितीनुसार, कालपर्यंत (ता. १४) देशात १२ कोटी ४८ लाख ३६ हजार ८१९ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. भारतात कोरोनामुळे आतापर्यंत १ लाख २९ हजार ६३५ जणांचा मृत्यू झाला आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मेक्सिकोमध्ये रुग्णसंख्या १० लाखांवर
मेक्सिको सिटी :
मेक्सिकोमध्ये कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. या देशातील कोरोनाबाधितांची संख्या दहा लाखांवर गेली असून यापैकी एक लाख जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या अधिक असण्याची शक्यता सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. म्हणजेच, या देशात कोरोनाचा मृत्यू दर १० टक्के आहे. मास्क वापरणे, सुरक्षित अंतर पाळणे, लॉकडाउन, चाचण्या या कोरोना काळात जगभरात पाळल्या जाणाऱ्या नियमांकडे किंवा उपायांकडे मेक्सिकोचे झालेले दुर्लक्ष हे परिस्थितीला कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सर्वांच्या चाचण्या घेणे म्हणजे पैसा, प्रयत्न आणि वेळेचा अपव्यय आहे, असे या देशाच्या सहाय्यक आरोग्य सचिवांचे म्हणणे आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT