CORONAVIRUS
CORONAVIRUS 
देश

भारतात कोरोनाबाधितांची संख्या वाढतीये; पण...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना व्हायरस अमेरिका, ब्राझील, भारतासह आता जगभरात थैमान घालत आहे. भारतातही याचे प्रमाण वाढत आहे. सध्या भारतातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भारतात आत्तापर्यंत 14,82,503 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. तसेच यातील मृतांची संख्याही वाढत आहे. 'वर्ल्डो मीटर्स'नुसार, देशभरात सध्या 14,82,503 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 33,448 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत 9,53,189 कोरोनाग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारत जगात तिसऱ्या स्थानावर

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या भारतात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जागतिक क्रमवारीत भारताचा क्रमांक वाढला आहे. भारत आता तिसऱ्या स्थानावर गेला आहे. तर अमेरिकेमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने अमेरिकेचे रुग्णसंख्येबाबतीत स्थान कायम आहे

कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 14 लाखांवर...

भारतात सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आत्तापर्यंत 14,82,503 नागरिकांना कोरोनाची लागण झाली. तर यामध्ये 33,448 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. देशात सध्या 4,95,866 ऍक्टिव्ह केसेस आहेत. याशिवाय यातील महत्त्वाची बाब म्हणजे 9,53,189 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करुन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

महाराष्ट्र, तमिळनाडू राज्यात रुग्ण वाढताहेत

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जवळपास 10 हजार सरासरी रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, सोमवारी यात कमालीची घट झाली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सर्वाधिक

देशातील विविध राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, महाराष्ट्रात याचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 3,75,799 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यामध्ये 13,656 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच मागील काही दिवसांत राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून, 2,13,238 रुग्ण बरे झाले आहेत. याशिवाय राज्यात 1,48,905 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT