corona-test 
देश

नव्या रुग्णांची संख्या पन्नास हजाराच्या खाली

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- कोरोना रुग्णांच्या संख्येत जगात अमेरिकेपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतात मंगळवारी सकारात्मक कल पहायला मिळाला.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत देशात 46,791 नवे रुग्ण आढळले व 587 लोकांनी प्राण गमावले. जुलैनंतर आज प्रथमच म्हणजे तब्बल तीन महिन्यांनी देशातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या 50 हजारांच्या खाली आली आहे. बरे होणाऱ्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल क्रमांकावर आहे.

देशात उपचाराखालील रूग्णसंख्या 7 लाख 48 हजार 538 झाली आहे. त्यात कालपासून 23,517 ने घट झाली. या संख्येपेक्षा कोरोनाला हरवून बरे होणाऱ्यांची संख्या 60 टक्‍क्‍यांनी जास्त आहे. आतापर्यंत 67,33,329 भारतीय बरे होऊन घरी परतले आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळ, तमिळनाडू व आंध्र प्रदेशातही उपचाराखालील रूग्णसंख्येत घट नोंदविली गेली आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र. तमिळनाडूतील स्थिती गंभीरच
महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांतील कोरोनाची परिस्थिती अद्याप गंभीर आहे. मात्र कोरोना चाचण्या व दर 100 चाचण्यांमागे नवीन संक्रमितांची संख्या या बाबतीत अविकसित समजल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड व आसाम या राज्यांनी वरील विकसित राज्यांवरही आघाडी घेतल्याचे गेल्या 14 दिवसांतील आकडेवारी सांगते. या चारही राज्यांत कोरोनाचा पॉझिटीव्हिटी रेट जेमतेम 2 टक्के राहिला आहे. चाचण्यांच्या बाबतीत बिहारने दिल्लीला व उत्तर प्रदेशाने महाराष्ट्रालाही मागे टाकले असून तेथे दिल्लीच्या दुप्पट चाचण्या होत आहेत.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : संसदरत्न पुरस्काराने खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा सन्मान

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT