number of farmers rice wheat producers decreased economic survey report of bihar  Sakal
देश

Farmer News : तांदूळ, गहू उत्पादक शेतकऱ्यांची संख्या घटली; बिहारचा आर्थिक पाहणी अहवाल

एकेकाळी ‘बिमारू’ राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिहारची प्रतिमा बदलत आहे. राज्याची राजधानी पाटणा आणि परिसरात समृद्धी वाढत असताना राज्यातील दुर्गम भाग हा अजूनही मागासलेलाच आहे.

सकाळ वृत्तसेवा

पाटणा : एकेकाळी ‘बिमारू’ राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिहारची प्रतिमा बदलत आहे. राज्याची राजधानी पाटणा आणि परिसरात समृद्धी वाढत असताना राज्यातील दुर्गम भाग हा अजूनही मागासलेलाच आहे.

कृषी क्षेत्राचा विचार केला तर शेती करणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. बिहारमध्ये सुमारे चार लाख १५ हजार शेतकऱ्यांनी तांदूळ, गहू व भाजीपाला लागवडीपासून पाठ फिरविली आहे. यात सर्वाधिक प्रमाण भातशेती करणाऱ्यांचे आहे. या श्रेणीत शेती सोडणाऱ्यांत घरामागे भाजीपाला घेणाऱ्यांची संख्या दुसऱ्या क्रमाकांवर आहे. तिसरा क्रमांक गव्हाच्या उत्पादनाने निराश झालेल्या शेतकऱ्यांचा आहे.

आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवालानुसार २०२१-२२ च्या तुलनेत सप्टेंबर २०२३ पर्यंत एक लाख ९२ हजार शेतकऱ्यांनी धानाची शेती करणे सोडून दिले. त्याचवेळी गहु उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या एक लाखाने कमी झाली आहे.

शेतात भाजीपाला घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५९ हजारांने कमी झाली आहे. त्याचवेळी स्वयंपाक घराच्या सांडपाण्यातून घराच्या मागे भाजीपाला पिकवणाऱ्या कुटुंबीयांच्या संख्येत ६४ हजारांनी घट झाली आहे.

भाजीपाला उत्पादक कमी झाले

बिहारचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री सम्राट चौधरी यांनी अलीकडेच विधानसभेत मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार, २०२१-२२ मध्ये १६.६४ लाख शेतकरी भातशेतीला प्राधान्य देत होते. २०२२-२३ मध्ये या संख्येत घट होत ती १४.७२ लाख राहिली आहे. २०२१-२२ मध्ये भाजीपाला घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ९ लाख ९२ हजार होती. नव्या पाहणी अहवालात ती संख्या आता ९ लाख ३३ हजार झाली आहे.

दूध विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली

आर्थिक सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार, कुक्कुटपालन आणि मेंढीपालन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दूध विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. २०२१-२२ मध्ये १.८६ लाख कुक्कुटपालन करणारे शेतकरी होते. आता त्यात दोन लाखांनी भर पडत ती संख्या १.८८ लाखावर पोचली आहे. दूध विक्री करणाऱ्यांची संख्या १.१५ लाखांवरून १ लाख २३ हजार झाली आहे.

पाटणा, बेगुसराय सर्वाधिक समृद्ध

आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवालानुसार, बिहारचे पाटणा, बेगुसराय, मुझफ्फरपूर, शेखपुरा, भोजपूर आणि सारण हे सर्वांत विकसित जिल्हे आहेत. त्याचवेळी अररिया, शिवहर, बांका, किशनगंज, लखीसराय हे सर्वांत मागास जिल्हे आहेत. सर्वात श्रीमंत जिल्हा पाटणा असून, सर्वांत गरीब जिल्हा शिवहर आहे. श्रीमंत जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर बेगुसराय, तर तिसऱ्या स्थानावर मुंगेर जिल्हा आहे.

दरडोई उत्पन्नात शिवहर सर्वांत पिछाडीवर

आर्थिक सर्वेक्षण अहवालात दरडोई उत्पन्नानुसार ३८ जिल्ह्याची रॅकिंग सादर केली आहे. राज्यात प्रत्येक व्यक्तीचे सरासरी उत्पन्न ५३ हजार ६३७ रुपये आहे. पाटण्यात हेच उत्पन्न १ लाख १४ हजार, ५४१ रुपये तर, बेगुसराय येथे ४६,९९१ रुपये आहे.

शिवहर, अररिया व सीतामढी येथे गरीब-श्रीमंतांत मोठी तफावत आहे. शिवहर जिल्ह्यात प्रति व्यक्ती उत्पन्न सर्वात कमी १८,९८० रुपये आहे. अररिया येथे १९,७९५ रुपये, सीतामढी येथे २१,४४८ रुपये आहे. पाटण्यातील प्रति व्यक्तीचे उत्पन्न हे राज्यातील सर्वात गरीब जिल्हा शिवहरच्या तुलनेत सहा पट जास्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT