Nupur Sharma case
Nupur Sharma case esakal
देश

आता भाजपनं शरमेनं मान खाली घालावी; नुपूर शर्माप्रकरणी काँग्रेसचा हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

सर्वोच्च न्यायालयानं नुपूर शर्माच्या विधानावरुन तिला चांगलंच सुनावलंय.

सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) नुपूर शर्माच्या (Nupur Sharma) विधानावरुन तिला चांगलंच सुनावलंय. तिनं आणि तिच्या बेताल वक्तव्यांमुळं संपूर्ण देश पेटला आहे. तिचं हेच विधान आणि त्यामुळं झालेला आक्रोश उदयपूर येथील दुर्दैवी घटनेला जबाबदार आहे, असं खंडपीठानं म्हटलंय.

सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलं आहे की, तिनं माफी मागितली आणि पैगंबरांबद्दलच्या टिप्पण्या मागे घेतल्या. पण, माघार घेण्यासाठी एक दिवस उशीर झाला. सर्वोच्च न्यायालयानं तिच्या तक्रारीवर एका व्यक्तीला अटक केली. परंतु, अनेक एफआयआर असूनही दिल्ली पोलिसांनी तिच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं.

दरम्यान, प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्माबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर, काँग्रेसनंही (Congress) आपली भूमिका मांडलीय. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) म्हणाले, सुप्रीम कोर्टानं निलंबित भाजप (BJP) नेत्या नुपूर शर्मा यांना पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळं जबाबदार ठरवलंय. त्यामुळं सत्ताधारी पक्ष भाजपनं शरमेनं मान खाली घालावी. तसंच न्यायालयानं विनाशकारी फूट पाडणाऱ्या विचारसरणी विरुद्ध लढण्याचा काँग्रेस पक्षाचा संकल्प बळकट केलाय, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

नुपूर शर्मा ही एका पक्षाची प्रवक्ता आहे. असे लोक धार्मिक नसतात. कारण, धार्मिक लोक प्रत्येक धर्माचा आदर करतात. देशातलं तापलेलं वातावरण पाहता नुपूर शर्मानं आता देशाची माफी मागावी, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. विशेष म्हणजे, नुपूर शर्मानं एका टीव्ही चर्चेदरम्यान पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर देशभरात निदर्शनं झाली. अनेक आखाती देशांमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर भाजप शर्मा यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं.

भाजपमध्ये मर्द नाही का? काँग्रेस नेत्या रेणुका चौधरींचा सवाल

नूपुर शर्मा प्रकरणात भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वानं कान धरून माफी मागायला हवी. भाजप माफी मागणार नाही का? या वादाचा पाया त्यांनीच रचला आहे. भाजपनं देशातील अल्पसंख्याकांची माफी मागावी. त्यांनी कान धरावं. भाजपनं महिलेला बळीचा बकरा बनवलं आहे. समोर येऊन माफी मागणारा एकही मर्द भाजपमध्ये नाही का? या लोकांनी पाण्यात बुडून मरावं, असं काँग्रेसच्या महिला नेत्या रेणुका चौधरी (Renuka Chaudhary) म्हटलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Certificates: केंद्राकडून CAAची प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; कोणाला मिळालं पहिलं प्रमाणपत्र? जाणून घ्या

Nashik Modi Rally: "मोदीजी आता कांद्यावर बोला" मोदींनी भाषण मध्येच थांबवलं! पिंपळगाव बसवंतच्या सभेत काय घडलं?

PVR Inox: T20 विश्वचषकासाठी पीव्हीआर आयनॉक्सचा मोठा प्लॅन; चित्रपटांनी निराश केल्यावर घेतला 'हा' निर्णय

PM Modi Nashik: नाशिकमध्ये पंतप्रधान अखेर कांद्यावर बोललेच; ऑपेरेशन ग्रीन, निर्यात बंदी आणि बफर स्टॉकबाबत म्हणाले...

Mumbai Metro: पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी मुंबईत मेट्रो बंद; सुरक्षेचे कारण देत घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT