kangana nwc 
देश

कंगनाची बाजू घेत राष्ट्रीय महिला आयोगाचा शिवसेनेवर निशाणा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानं वाद निर्माण झाला आहे. बॉलीवूडसह मराठी कलाकार आणि राजकीय नेत्यांनीसुद्धा कंगनाला यावरून सुनावलं आहे. दरम्यान, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगनाला थेट धमकीच दिली असून कंगना मुंबईत आल्यास शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या तिचे तोंड फोडतील असं म्हटलं होतं. कंगनाच्या ट्विटनंतर शिवसेना आमदारांनी दिलेल्या धमकीची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी प्रताप सरनाईक यांच्या अटकेची मागणी केली आहे. 

प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं की, खासदार संजय राउत यांनी कंगनाला सौम्य शब्दात सांगितलं पण ती जर इथं आली तर शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या तिला चोख प्रत्युत्तर देतील. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली. यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या की प्रताप सरनाईक यांनी कंगनाला धमकी दिली आहे. त्यांना तात्काळ अटक करायला हवी आणि मुंबई पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे असंही त्या म्हणाल्या. 

कंगनाने केलेल्या ट्विटमधून तिनं देशाविरोधात असं कोणतं वक्तव्य केल्याचं किंवा कोणाला धमकी दिल्याचं वाटत नाही असं राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटलं आहे. यातून शिवसेना नेत्यांची मानसिकता दिसून येते. जर महिला स्वतंत्रपणे त्यांची मते मांडत असतील तर ते पाहवत नसल्याचंही मत रेखा शर्मा यांनी नोंदवलं. 

याआधी कंगनाने गुरुवारी शिवसेना नेते संजय राउत यांना प्रत्युत्तर देताना म्हटलं होतं की, शिवसेना नेते संजय राउत यांनी उघड धमकी दिली आहे. मुंबईत परत न येण्यासाठी सांगितलं आहे. आधी मुंबईच्या रस्त्यावर स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या आता धमक्या दिल्या जात आहेत. शेवटी मुंबईत पाकव्याप्त काश्मीरसारखं का वाटत आहे. असं तिने म्हटलं होतं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT