Supreme Court Sakal
देश

OBC Reservation : राज्याच्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी लांबणीवर

सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण रद्दबातल ठरवलं आहे. कोर्टाच्या या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत (OBC Reservation) महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळं आता ही सुनावणी १९ जानेवारी रोजी होणार आहे. या दिवशी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारच्या याचिकेवर एकत्रित सुनावणी होणार आहे. (OBC Reservation Maharashtra reconsideration petition hearing postpone)

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारच्या ओबीसी आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर न्या. अजय खानविलकर यांच्या खंडपीठापुढं ही सुनावणी होणार होती. मात्र, १५ डिसेंबर २०२१ रोजी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालात म्हटलं होतं की, ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या २७ टक्के जागा निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा नोटिफाय कराव्यात आणि त्या खुल्या प्रवर्गाला उपलब्ध करुन द्याव्यात. यानंतर यासंदर्भात मध्य प्रदेश सरकारनं सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

दरम्यान, या संदर्भातील महाराष्ट्र सरकारनेही आज पुनर्विचार अर्ज दाखल सुप्रीम कोर्टात दाखल केला. वरिष्ठ वकील शेखर नाफडे यांनी सरकारच्यावतीनं कोर्टाला सांगितलं की, आमचा अर्ज आज दाखल झाला असून दोन दिवसांनी यावर सुनावणी घेण्यात यावी. सुप्रीम कोर्टानं त्यांची ही विनंती तात्काळ मान्य केली. तसेच या मागणीला कोणीही आक्षेप घेतला नाही, त्यामुळं या संदर्भात कोर्टात युक्तीवादही झाला नाही आणि कोर्टानं पुढील सुनावणी १९ जानेवारी रोजी निश्चित केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT