Objection on literary service Mamata Banerjee Kolkata esakal
देश

ममता बॅनर्जींच्या साहित्यसेवेवर आक्षेप

पुरस्काराबद्दल लेखकांची अपमान झाल्याची भावना

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : बंगाली लेखिका आणि लोकनृत्य संशोधक रत्ना रशीद बॅनर्जी यांनी पश्‍चिमबंग बांगला अकादमीने दिलेला पुरस्कार मंगळवारी परत केला आहे. या संस्थेने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा साहित्यातील योगदानासाठी विशेष गौरव केला. त्यावरून साहित्यविश्‍वात नाराजीचा सूर उमटला.

रवींद्रनाथ टागोर यांच्या १६१ व्या जयंतीनिमित्त सोमवारी राज्य सरकारने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पश्‍चिमबंग बांगला अकादमीने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नवा विशेष साहित्य पुरस्कार जाहीर केला आहे. ‘कविता बितन’ या ९०० कवितांचा समावेश असलेल्या संग्रहासाठी मुख्यमंत्र्यांची पहिल्याच पुरस्कारासाठी निवड झाली. याच्या निषेधार्थ रत्ना बॅनर्जी यांनी २०१९मध्ये मिळालेला अन्नदा शंकर स्मारक सन्मान पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला.

टीकेचे सूर

ममता बॅनर्जी यांना साहित्य पुरस्कार देण्यावरून बंगालमधील साहित्य क्षेत्रातून रोष व्यक्त होत आहे. पुरस्काराच्या निषेधार्थ बंगाली भाषा अकादमीच्या सल्लागार मंडळाचे अनादीरंजन विश्‍वास यांनी राजीनामा दिला. लेखिका तस्लिमा नसरीन यांनीही त्यांच्या फेसबुकवरून टीका केली. सर्वत्र टीका होऊ लागल्याने एक लाख रुपयांचा हा पुरस्कार ममता बॅनर्जी स्वीकारणार नसल्याचे अकादमीने जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Bus Fire : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रवासी बसला अचानक आग; मोठी दुर्घटना टळली, नेमकं काय घडलं?

Team India : रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ चा वर्ल्ड कप खेळणार का? मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा सर्वात मोठा खुलासा; म्हणाला, शुभमन...

Crime News: पैशासाठी रचला स्वतःच्या अपहरणाचा कट;फायनान्स कर्मचाऱ्यासह तिघांवर गंगापूर पोलिसांत गुन्हा नोंद

Shirur Kasar Drought : गावाकडच्या मुक्या जिवांसाठी ‘विठ्ठल’ धावला ; लेकाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून व्यावसायिक देणार १५० टन चारा

जमुई प्रकरण: महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न की राजकीय ध्रुवीकरण?

SCROLL FOR NEXT