pink stone
pink stone 
देश

राम मंदिराच्या उभारणीत अडथळा; राजस्थान सरकारनं 'पिंक स्टोन' खाणकाम थांबवलं

सकाळ ऑनलाईन टीम


आयोध्या: आयोध्येत राम मंदिराच्या भूमीपुजनानंतर मंदिराच्या कामाला वेग आला होता. पण आता राजस्थान सरकारने बंसी पहाडपूरमधील गुलाबी दगड (Pink Stone) खाण बंद केली आहे. यामुळे अयोध्येच्या राम मंदिरच्या (Ram Mandir) बांधकामाला वेळ लागू शकतो. कारण इथले  गुलाबी दगड मंदिराच्या बांधकामासाठी वापरले जाणार होते. 

राम मंदिराच्या बांधकामासाठी जवळपास 3 लाख घनफूट दगडांची गरज आहे. पण आतापर्यंत 1 लाख घनफूट दगडांचीच व्यवस्था झाली आहे. जवळपास 20 हजार घनफूट दगडे हे रामसेवक पुरममध्ये ठेवलेले आहे. आता उरलेली दगडं हे बंसी पहाडपूर येथील खाणीतून अयोध्येसाठी मागवण्यात आली होती. पण आता राजस्थानमधील काँग्रेस सरकारने या खाणीचं काम थांबवल्याने राम मंदिराच्या कामाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

 राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे. वेळ आल्यावर याची माहिती देऊ, असं त्यांनी सांगितलं आहे. यापुर्वी राजस्थान मायनिंग विभाग तसेच  हरातपूर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी बंसी पहाडपूरमध्ये अवैध्य खाण उत्खनन होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.  ' याभागात कोणत्याही परवानगीशिवाय उत्खनन सुरू होते, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नथमल दिदेल यांनी दिली आहे.

अयोध्येत राम मंदिर बांधकामाला लवकर सुरुवात होणार आहे. राम मंदिराच्या पायाभरणी कामाची चाचणीही सुरू करण्यात आली आहे. तसेच कार्यशाळेत पिंक स्टोनही ठेवण्यात आले आहे. ते राम जन्मभूमी परिसरात कसे आणायचे याची रणनीती आखली जात आहे. त्याच दरम्यान, राजस्थानमधून ही धक्कादायक बातमी आली आहे. त्यामुळे राजस्थानमधून येणाऱ्या गुलाबी दगडांचा पुरवठा तुर्तास थांबवण्यात आला आहे.'राम मंदिर निर्माणसाठी 1990 मध्ये कार्यशाळा स्थापन करण्यात आली. तेव्हापासून  बंसी पहाडपूर राजस्थान येथून दगडं मागवण्यात येत होते.' अशी माहिती राम मंदिर कार्यशाळेचे  मॅनेजर अन्नू भाई सोमपुरा यांनी दिली आहे.

गुलाबी दगडांची विषेशतः-
राजस्थान येथील बंसी पहाडपूर येथील गुलाबी दगडं राम मंदिर निर्माणासाठी  महत्त्वपूर्ण आहे. विशेष म्हणजे पिंक स्टोन हा मार्बलपेक्षाही स्वच्छ आणि दिसायला सुंदर आहे. या दगडाचे आयुष्य हे जवळपास 1000 वर्ष इतकं असतं. राजस्थानातील पिंक स्टोन दगडं ही पक्की आणि उत्तम दर्जाची आहे. त्यामुळे ती राम मंदिराच्या बाधकामासाठी वापरण्यात येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT