odisha assembly election 2024 Papu Pom Pom Ollywood stars may Join biju janata dal election campaign marathi news  
देश

Odisha Assembly Election 2024 : बीजेडीचा प्रचार करणार 'पप्पू पॉम पॉम'? पटनाईक यांच्यासोबत भेटीनंतर चर्चांना उधाण

Odisha Assembly Election 2024 : ओडिशामध्ये सत्ताधारी पक्षाच्या प्रचारात ओडिशा चित्रपटसृष्टीतील (ऑलिवूड) कलाकार सहभागी होण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

भुवनेश्‍वर : ओडिशातील विधानसभा निवडणुकीसाठी काही जागांसाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया बिजू जनता दलात (बीजेडी) सुरू असताना पक्षाने प्रचाराची रणनीतीवर लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. सत्ताधारी पक्षाच्या प्रचारात ओडिशा चित्रपटसृष्टीतील (ऑलिवूड) कलाकार सहभागी होण्याची शक्यता आहे.

उडिया चित्रपट उद्योगातील अनेक अभिनेते, विनोदी कलाकार आणि गायकांनी मुख्यमंत्री आणि पक्षाचे सर्वेसर्वा नवीन पटनाईक आणि फाइव्ह टी’चे (ट्रान्फॉर्मेशन इनिशिएटिव्ह) अध्यक्ष व्ही.के. पांडियन यांची ‘नवीन निवास’ येथे नुकतीच भेट घेतली. या भेटीच्या उद्देशाबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गोपनीयता बाळगली असली तरी निवडणूक प्रचारात सहभागी होणार असल्याचे काही कलाकारांनी सांगितले. गेल्या निवडणुकीपासून ‘बीजेडी’ने हाती घेतलेली विविध विकासकामे आणि पुढील दशकात पक्षाचा राज्यासाठीचा दृष्टिकोन याविषयी प्रबोधन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

‘‘बीजेडी’साठी कलाकार प्रचार करणार असल्याने सरकारने राज्यात केलेली विकासकामे आणि पक्षाचे भविष्यातील योजना याविषयी माहिती घेण्यास आम्हाला सांगण्यात आले. सरकारच्या विकासकामांसंदर्भा आमचे प्रबोधन करण्यात आले,’’ असे लोकप्रिय विनोदी कलाकार प्रज्ञान रंजन याने सांगितले. २०२४ ते २०३४ या दहा वर्षांतील ‘बीजेडी’च्या विकास आराखड्यावर बैठकीत चर्चा झाल्याचे अभिनेत्री सुप्रिया म्हणाल्या.

मुख्यमंत्री पटनाईक यांच्याबरोबर झालेल्या या बैठकीचा निवडणूक किंवा प्रचाराशी काहीही संबंध नव्हता. उडिया चित्रपटसृष्टीच्या उद्योगाच्या विकासाबद्दल मुख्यमंत्री आणि फाइव्ह टी’च्या अध्यक्षांनी आमच्याशी चर्चा केली.

- पप्पू पॉम पॉम, अभिनेता, ओडिशा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT