देश

कोरोनामुळे ओडिशा ठरले असुरक्षित राज्य 

स्मृती सागरिका कानुनगो -सकाळ न्यूज नेटवर्क

भुवनेश्‍वर -  कोरोनाव्हायरसच्या फैलावामुळे भारतातील अत्यंत असुरक्षित असलेल्या नऊ राज्यांमध्ये ओडिशाचा समावेश झाला आहे. ‘लॅन्सेट’ या मासिकात प्रसिद्ध झालेल्या पर्यावरणीय अभ्यासात भारतातील बिहार, मध्य प्रदेश, तेलंगण, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्‍चिम बंगाल, गुजरात आणि ओडिशा ही राज्ये कोरोनामुळे अत्यंत असुरक्षित (निर्देशांक मूल्य ०.७५ पेक्षा जास्त) असल्‍याचे म्हटले आहे. जगाच्या तुलनेत या राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठी नसली तरी या जागतिक साथीचा परिणाम त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे यात म्हटले आहे. 

या निर्देशांकामुळे कोरोनाला प्रतिबंध व त्याचा धोका कमी करण्यासाठी उपायांचे नियोजन करणे आणि प्राधान्यक्रमावरील भागांत स्त्रोतांचे योग्य वितरण करणे धोरणकर्त्यांना शक्य होईल, असे या अभ्यासात नमूद केले आहे. सामाजिक-आर्थिक, भौगोलिक, गृह व स्वच्छता, साथीचे रोग आणि आरोग्य व्यवस्था या मुद्यांच्या आधार या अभ्यासासाठी घेतला आहे. 

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अभ्यासातील निष्कर्ष 
- भारतात कोरोनाचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे. 
-६४० पैकी ६२७ जिल्ह्यांमध्ये (९८ टक्के) कोरोना पसरला आहे. 
-जिल्हास्तरिय नियोजनासाठी साधनांची गरज 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Crash: शेअर मार्केट क्रॅश! सेन्सेक्स तब्बल ७०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपये बुडाले

ITR Filing 2026: कर बचतीची संधी सोडू नका! New Tax Regime मधील हे 8 फायदे बहुतेकांना माहितीच नाहीत

Navi Mumbai: नवी मुंबईच्या ५,५७५ कोटींच्या मेट्रो प्रकल्पास मंजुरी, राज्य सरकारकडून हिरवा कंदील

भीषण अपघात! बसमधून उरताच ट्रकने उडवलं, चिमुकलीसह दोघांचा दुर्दैवी मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर...

Maharashtra Rain Update: मान्सूनची आगेकूच! महाराष्ट्रात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता; IMD ची मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT