system
देश

मटण न मिळाल्यामुळे तिला भर मांडवात सोडलं

मटणाचं जेवण नसल्यामुळे वऱ्हाड्यांना आला राग; अन्...

शर्वरी जोशी

आपल्या लाडक्या लेकीचं मोठं धुमधडाक्यात लग्न wedding व्हावं अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. त्यामुळे संपूर्ण आयुष्यभर कष्ट करुन आई-वडील मुलीच्या लग्नासाठी पैसे जमा करत असतात. मात्र,अनेकदा ऐन लग्नात अशा काही घटना घडतात, ज्यामुळे वर्षांपासून पाहत असलेलं आई-वडील स्वप्न अवघ्या क्षणार्धात उद्धवस्त होतं.असाच काहीसा प्रकार ओडिसामध्ये odisha घडला आहे. लग्नात जेवताना केवळ मटण वाढलं नाही या गोष्टीचा राग आल्यामुळे एका मुलाने भर मांडवात लग्न मोडलं. (odisha-dulha-walks-out-of-wedding-as-baraatis-not-served-mutton)

ओडिसामधील जाजपूर येथे एका लग्नात हा प्रकार घडला आहे. लग्नाची धामधूम सुरु असतानाच मुलीकडच्यांनी मोठ्या थाटात वऱ्हाड्यांचं स्वागत केलं. यात लग्नाचे विधी सुरु असतानाच जेवणात मटण नसल्याचं वऱ्हाड्यांच्या लक्षात आलं. त्यावरुन मुलाकडच्यांनी ऐन लग्नात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे लग्न ठरवतानाच लग्नात मटणाचं जेवण हवं असं सांगितलं होतं. तरीदेखील जेवणाची नीट व्यवस्था न केल्यामुळे नवरदेवाच्या रागाचा पारा चढला. आणि, त्याने त्याच क्षणी लग्न मोडलं.

त्याच दिवशी केलं दुसऱ्या मुलीशी लग्न

मटण मिळालं नाही म्हणून लग्न मोडणाऱ्या या मुलाने त्याच दिवशी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केल्याचं समोर आलं. लग्नात मटण नसल्यामुळे मुलीकडच्यांनी नवरदेव आणि त्याच्या कुटुंबियांना पुरेपूर समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी जराही ऐकून घेतलं नाही आणि लग्न मोडलं. लग्न मोडल्यानंतर हा नवरदेव त्याच्या एका नातेवाईकासोबत त्यांच्या गावी गेला आणि त्याच दिवशी रात्री अन्य एका मुलीबरोबर लग्न केलं.

दरम्यान, या प्रकरणी मुलीकडच्यांनी कोणतीही तक्रार दाखल केली नाही. मात्र, तक्रार दाखल झाली तर नक्कीच या मुलावर कायदेशीर कारवाई करु, असं येथील स्थानिक पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT