Odisha Train Accident 
देश

Odisha Train Accident : बालासोर ट्रेन दुर्घटनेतील पीडितांच्या मदतीला धावले अदानी, घेतला 'हा' मोठा निर्णय!

Sandip Kapde

Odisha Train Accident :ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. या अपघातात असंख्य लोकांनी आपले जवळचे नातेवाईक गमावले आहेत. या अपघातात काहींनी आई गमावली, काहींनी बहिण गमावली, काहींनी वडील तर काहींनी भाऊ गमावला.

या अपघातामुळे २८८ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर जखमींचा आकडा १२०० च्या पुढे गेला आहे. या अपघाताची चौकशी करण्याच्या सूचना रेल्वेकडून देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे. याशिवाय अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना रेल्वेकडून आर्थिक मदतही जाहीर करण्यात आली आहे. (Odisha Train Accident)

अदानी समुहान देखील मोठा निर्णय घेतला आहे. ओडिशा रेल्वे दुर्घटनेत ज्यांनी आपले पालक गमावले आहेत अशा निष्पाप मुलांच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी अदानी समूह घेईल, असे आम्ही ठरवले आहे, अशी घोषणा अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी केली.

पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना बळ देणे आणि मुलांना चांगले भविष्य देणे ही आपल्या सर्वांची संयुक्त जबाबदारी आहे, असे अदानी म्हणाले. गौतम अदानी यांच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर त्यांचे खूप कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, पण सुरक्षा कच्ची! बीएमसी मुख्यालयातील बॅग स्कॅनर बंद; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Tenancy Agreement Rule: भाडेकरू आणि घरमालकांनो लक्ष द्या... सरकारकडून ‘नवीन भाडे करार २०२५’ लागू; काय आहेत नवे नियम?

Dondaicha News : दोंडाईचा नगर परिषदेत भाजपचा ऐतिहासिक विजय; नगराध्यक्षांसह ७ नगरसेवक बिनविरोध

Kolhapur Shivaji University: पदव्युत्तर अभ्यासकेंद्रांना कुलूप, अभ्यासक्रम बंद करण्यासाठी महाविद्यालयांचा प्रस्ताव

Jaykumar Rawal : तोंडाला फेस आणणारी घोडदौड; दोंडाईचा निवडणुकीत नगराध्यक्षपद व ७ जागा बिनविरोध, मंत्री जयकुमार रावल यांचा वरचष्मा

SCROLL FOR NEXT