Aligarh Muslim University Aligarh Muslim University
देश

प्राध्यापकाने लिहिली हिंदू देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी

सकाळ डिजिटल टीम

अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीतील (Aligarh Muslim University) साहाय्यक प्राध्यापक डॉक्टर जितेंद्र कुमार यांनी हिंदू देवी-देवतांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत. ही बाब समोर आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे (Aligarh Muslim University) प्राध्यापक डॉक्टर जितेंद्र कुमार यांनी बलात्काराच्या मुद्द्यावर केलेल्या सादरीकरणात हिंदू देवी-देवतांवर आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत. सोशल मीडियावर स्लाइडचे (social media) चित्र समोर आल्यानंतर एएमयू प्रशासन आणि मेडिसिन फॅकल्टी यांनी जितेंद्र कुमार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विद्यार्थी, कर्मचारी आणि नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप प्राध्यापकावर करण्यात आला आहे.

जितेंद्र कुमार यांच्याबाबत अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून पोलिसांकडे तक्रार केली आहे. देवतांवर आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्याबद्दल लोक एएमयू आणि प्राध्यापकांचा (professor) निषेध करीत आहेत. पोलिसांकडून कठोर कारवाई करून जितेंद्र कुमार यांना अटक करण्याची मागणी होत आहे. यानंतर एएमयू प्रशासनाने फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे साहाय्यक प्राध्यापक जितेंद्र कुमार यांना कारणे दाखवा नोटीस बजावून २४ तासांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

दोन सदस्यीय चौकशी समिती स्थापन

डीनच्या शिफारशीनुसार, विद्यापीठाने दोन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. मेडिसिन विद्याशाखेचे प्राध्यापक (professor) राकेश भार्गव याची चौकशी करतील आणि अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी उपाययोजना सुचवतील. दरम्यान, डॉ. जितेंद्र कुमार यांनी माफी मागितली आहे, असे एएमयूने निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

SCROLL FOR NEXT