Ola
Ola Sakal
देश

ओलाने फिरताय AC लावण्यासाठी द्यावे लागतील अतिरिक्त पैसे?

सकाळ डिजिटल टीम

Ola Cab : आपल्यापैकी अनेकजण इकडे-तिकडे फिरण्यासाठी ओला किंवा उबर कॅबचा (Ola Uber Cab) वापर करत असतो. त्यात गेल्या काही दिवसांपासून वाहतूकीच्या वाढत्या कोंडीमुळे आणि वाढत्या इंधनाच्या (CNG Price) दरांमुळे अनकेजण स्वतःचे वाहन वापरण्याऐवजी ओला, उबर सारख्या कॅब वापरण्याकडे वळत आहेत. मात्र, आता वाढत्या इंधन दरवाढीचा फटका कॅबने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसू लागला आहे. सीएनजीच्या वाढत्या किमतींचा ओला, उबेर कॅब चालकांवरही परिणाम झाला असून त्यामुळे त्यांची कमाई कमी झाली आहे. (OLA Cab Drivers Taking Extra Charges For Running AC During Ride)

हा तोटा भरून काढण्यासाठी दिल्लीतील काही कॅब चालकांनी (Cab Driver) कारमध्ये एसी चालवण्यासाठी वेगळे पैसे आकारण्यास सुरुवात केले आहे. बुधवारी सीएनजीच्या (CNG) दरात 2.50 रुपयांची वाढ झाली असून, या वाढीमुळे दिल्लीत लोकांना एक किलो सीएनजीसाठी 66.61 रुपये मोजावे लागणार आहेत. याबाबत अनेक पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याबाबत एबीपी हिंदीने वृत्त प्रकाशित केले आहे.

याबाबत बोलताना ओला कॅब ड्रायव्हर मोहम्मद फरमान यांनी सांगितले की, "सीएनजीच्या किमती वाढल्यामुळे आमची कमाई पूर्णपणे संपली आहे. भाडे वाढत नाहीये. फक्त काही ड्रायव्हर अशाप्रकारे एसी चालवण्यासाठी जास्तीचे शुल्क घेत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे घर चालण्यासाठी जेवढी कमाई होणे अपेक्षित आहे ती होत नाहीये. पूर्वी सीएनजीचे दर स्थिर होते तेव्हा बचत होत होती. तसेच घर खर्च चालवणेदेखील सोपे होते. मात्र, वाढत्या सीएनजीच्या दरांमुळे सर्व संपले आहे.

सीएनजीच्या दरात 14 रुपयांनी वाढ

ओला, उबर सारख्या कंपन्यांनी कॅबच्या भाड्यात वाढ केली तर, या सेवांचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी होऊन याचा फटका कंपन्यांना बसू शकतो. त्यामुळे भाडे वाढ केली जात नाहीये. गेल्या 3 महिन्यांत सीएनजीच्या दरात 14 रुपयांनी वाढ झाली आहे. 1 जानेवारी रोजी सीएनजीची किंमत 52 रुपये प्रति किलोच्या जवळपास होती, ती आता 66.61 रुपये प्रति किलो झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT