jyotiraditya scindia and sonia gandhi in parliament 
देश

ज्योतिरादित्य सिंधिया जुन्या संसदेच्या शेवटच्या दिवशी दिसले सोनिया गांधी यांच्या शेजारी अन्...

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - 19 सप्टेंबर 2023 चा गणेश चतुर्थीचा दिवस भारताच्या इतिहासात अजरामर झाला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या संसदेत शेवटचे भाषण केले आणि त्यानंतर संविधानासह नवीन संसद भवनात प्रवेश केला. जुन्या संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान संसद टीव्हीवर अनेक क्षणचित्रे दाखवण्यात आली होती. परंतु सोनिया गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

जुन्या संसदेत शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया सेंट्रल हॉलमध्ये एका जागेवर बसलेले दिसले. संसद टीव्हीचा कॅमेरा जेव्हा-जेव्हा ज्योतिरादित्य आणि सोनिया गांधींकडे गेला तेव्हा दोन्ही नेते भाषण ऐकताना दिसले. तथापि, पीटीआय या वृत्तसंस्थेने संध्याकाळी प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया सोनिया गांधींना शुभेच्छा देताना दिसले.

ज्योतिरादित्य दीर्घकाळ काँग्रेसमध्ये होते, पण 2020 मध्ये त्यांनी त्यांच्या समर्थकांसह बंड केले आणि मध्य प्रदेशातील कमलनाथ यांचे सरकार पाडले. यानंतर ते भाजपमध्ये दाखल झाले. ज्योतिरादित्य सिंधिया सध्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्रालय सांभाळत आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस पक्षाविरुद्ध बंड केले तेव्हा राहुल गांधी म्हणाले होते की, “काँग्रेसमधील ते एकमेव नेते होते, जे कधीही माझ्या घरात येऊ शकतात. कॉलेजमध्ये ते माझ्यासोबत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT