air travel esakal
देश

कर्नाटकात आढळलेल्या ओमिक्रॉन संक्रमित रुग्णानं सोडला देश!

कर्नाटकच्या आरोग्य मंत्रालयाची माहिती

Amit Ujagare (अमित उजागरे)

बंगळुरू : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचे दोन रूग्ण गुरुवारी कर्नाटकात आढळून आल्यानंतर देशाच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, भारतात आढळलेल्या ओमिक्रॉनच्या या दोन रूग्णांपैकी एक रूग्ण दक्षिण अफ्रिकेसाठी रवाना झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी ही माहिती दिली.

कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या माहितीनुसार, ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आलेला 66 वर्षीय प्रवासी हा दक्षिण अफ्रेकिचा रहिवासी असून 20 नोव्हेंबर रोजी दक्षिण अफ्रिकेतून तो कर्नाटकमध्ये दाखल झाला होता. यावेळी त्याच्याकडे कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल होता. तसेच त्याने लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते. दरम्यान, तो राहत असलेल्या हॉटेलमध्ये त्याने पुन्हा चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. परंतु, त्याला कोणत्याही प्रकारची लक्षणे नव्हती. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून त्याला इतरांपासून विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर त्याचे नमुने पुन्हा घेऊन ते 22 नोव्हेंबर रोजी जिनोम सिक्वेनसिंगसाठी पाठविण्यात आले. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या 24 लोकांचीदेखील कोरोना चाचणी करण्यात आली होती. या सर्वांची चाचणी निगेटिव्ह आली.

दरम्यान, या 66 वर्षीय व्यक्तीने 23 नोव्हेंबर रोजी खाजगी प्रयोगशाळेत त्याची कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचा निकाल निगेटिव्ह आला. त्यानंतर 27 नोव्हेंबर रोजी संबधित व्यक्तीने मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलमधून चेक आउट केलं आणि टॅक्सीने विमानतळ गाठलं त्यानंतर तो दुबईमार्गे दक्षिण अफ्रिकेला रवाना झाला.

दरम्यान, दुसरी एक व्यक्ती ओमिक्रॉन संक्रमित असल्याचं समोर आलं असून ही व्यक्ती ४६ वर्षीय डॉक्टर आहे. या डॉक्टरची कुठलीही ट्रॅव्हर हिस्ट्री नसल्याचं सांगण्यात येत आहे. या व्यक्तीच्या संपर्कात पाच लोक आले होते ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळं या सहा जणांना आयसोलेट करुन सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यांपैकी एकाही व्यक्तीमध्ये गंभीर स्वरुपाची कोणतीही लक्षण आढळलेली नाहीत. या सर्वांनी लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत.

या सर्व पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. याचा अहवाल समोर आल्यानंतरच याबाबत खुलासा होऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT