Omicron Team eSakal
देश

Omicron : अमेरिका सावध; 4 रुग्ण आढळताच प्रवासावर लावले निर्बंध

Omicron मुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

सुधीर काकडे

कोरोना महामारीच्या मोठ्या संकटातून जग बाहेर पडत असतानाच पुन्हा कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरीअंटने जगभरासाठी चिंतेचं वातावरण निर्माण केलं आहे. जगातले प्रगत देश म्हणून पाहिलं जाणाऱ्या अमेरीकेसारख्या देशांनाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा चांगलाच फटका बसला होता. मात्र यंदा सर्वच देशांकडून खबरदारीच्या उपयांचा अवलंब केल्याचा जात असल्याचं दिसतं आहे. अमेरिकेत देखील आता ओमिक्रॉन विषाणूचे रुग्ण आढळून आल्यानंतर व्हाईट हाऊसकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनने देशातील २९ च्या जवळपास देशांमध्ये शिरकाव केला आहे. सुरुवातील दक्षिण आफ्रिकेसारख्या जोखीम असलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, आता प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. प्रवाशाचे कोरोना लसीकरण झाले असेल आणि जोखीम नसलेल्या देशातून प्रवासी अमेरिकेत जात असेल तरी त्यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्वत: या मुद्याची गंभीर दखल घेतली असून, देशातील आणि देशाबाहेरील प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार आता अमेरिकेत कुठेही प्रवास करण्यासाठी कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. प्रवास करताना लसीकरण आणि प्रवासाबद्दलची माहिती देणे आवश्यक असणार आहे.

दरम्यान, गुरुवारी अमेरिकेत देखील पहिला ओमिक्रॉनचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर तिथे आणखी चार ते पाच रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अमेरिकिने निर्बंध आणखी कडक केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT