Omicron update world health Organization omicron in ten countries esakal
देश

Omicron update world: ओमिक्रॉनचा जगभरात वाढता वेग

डब्लूएचओचा इशारा; दहा देशांत विस्तार

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतात सर्वप्रथम आढळलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरियंटने जगभरात पुन्हा वेगाने हातपाय पसरण्यास सुरवात केल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जागरुकतेचा इशारा दिला आहे. भारतासह अन्य देशांनी याबाबत आरोग्य दिशानिर्देशांच्या कडक पालनाबाबत खबरदारी घ्यावी असे सांगण्यात आले आहे. मागच्या एका आठवड्यात ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरियंटचे बीए.२.७५ हे नवे उपस्वरूप असलेला विषाणू वेगाने पसरत असल्याचे निदर्शनास आल्याचे ‘डब्ल्यूएचओ’चे महासंचालक टेड्रॉस अधनोम घेब्रेयेसूस यांनी सांगितले. यात एकाच आठवड्यात ३० टक्के रुग्णवाढीचा कल आढळला आहे. युरोप व अमेरिकेत सध्या कोरोना विषाणूंच्या बीए-४ व बीए-५ या व्हेरियंटचे रूग्ण जास्त आढळत आहेत.

भारतातही रूग्णसंख्येचा वाढता कल असून आज सकाळपर्यंतच्या २४ तासांत १८९३० नवे रुग्ण आढळले आहेत. बुधवारच्या तुलनेत रूग्णसंख्या २७७१ ने वाढली आहे. देशातील सक्रिय कोरोनाग्रस्तांच्या संख्येने पुन्हा लाखाचा आकडा ओलांडला असून ती १ लाख १९ हजार ४७५ वर पोचली आहे. ‘डब्ल्यूएचओ’च्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करताना म्हटले, की ओमिक्रॉन बीए.२.७५ हा व्हेरियंट जास्त तीव्र स्वरूपाचा आहे. आतापावेतो तो १० देशांत आढळला आहे. याच्या ‘स्पाईक प्रोटीन'' मध्येही वेगाने बदल होत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. याचा प्रसार वेगाने होत असल्याने विविध देशांनी त्वरित खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. मात्र हा नवा व्हेरियंट चिंताजनक असल्याचे जाहीर करण्यास जागतिक आरोग्य संघटनेने तूर्तास काहीही सांगितलेले नाही. आम्हाला थोडे थांबावे लागेल व आमच्या वैज्ञानिक गटाच्या अहवालावर नजर ठेवावी लागेल, असे स्वामिनाथन यांनी स्पष्ट केले.

राज्यात कोरोनाचे नवे २,६७८ रुग्ण

मुंबई : राज्यात गुरुवारी दिवसभरात २,६७८ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून आठ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्युदर १.८५ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२२,६३,४८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,९५,७२९ (०९.७२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात गुरुवारी दिवसभरात ३,२३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ७८,२८,३५२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९१ टक्के एवढे झाले आहे. राज्यात गुरुवारी १९,४१३ ॲक्टिव्ह रुग्ण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hajare Karandak : मुंबई संघाचा विजयी चौकार; ४४४ धावांचा डोंगर, सर्फराझचे झंझावाती दीडशतक

Nashik Municipal Election : नाशिकमध्ये 'महायुती'चा गोंधळ! राष्ट्रवादीने २१ की ४१ जागा लढवायच्या? नेत्यांकडेच उत्तर मिळेना

Viral Video: रिलसाठी जीवाशी खेळ नडला ! शरीराला आग लावून धावत्या बाईकवर स्टंट अन् पुढच्या क्षणात नको तेच घडलं; धडकी भरवणारा व्हिडिओ

Udayanraje Bhosale: मित्र नगराध्यक्ष होताच उदयनराजेंच्या डोळ्यात आनंदाश्रू; मध्यरात्रीच गाठलं कराड, शिवसेना नेत्याच्या गळाभेटीने चर्चांना उधाण!

आधी वेळ बदलली, आता मालिकाच बंद होणार; फक्त ८ महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका, पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT