Coronavirus sakal media
देश

IMA ने दिला तिसऱ्या लाटेचा इशारा; सरकारला सुचवल्या 'या' सुचना

वैज्ञानिकांना केलेल्या संशोधनानुसार ओमिक्रॉनचा व्हेरिएंट अधिक वेगाने पसरुन मोठ्या प्रमाणात नागरिकांना बाधित करु शकतो

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाचा (Coronavirus) नविन व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने (Omicron Variant) जगात धुमाकूळ घातला आहे. भारतातही त्याचे रुग्ण आढळले असून, त्याचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल एसोसिएशन (IMA) ने आरोग्य कर्मचारी (Health Workers) आणि रोग प्रतिकारशक्ती (Immunity) कमी असलेल्या नागरिकांना बुस्टर डोस (Booster Dose) देण्याची विनंती केली आहे. तसेच, आईएमएने केंद्र सरकारकला १२ ते १८ वर्षातील मुलांना लसीकरणाच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी सुचित केले आहे.

आतापर्यंत देशात ओमिक्रॉनचे २३ रुग्ण आढळले आहे. वैज्ञानिकांना केलेल्या संशोधनानुसार ओमिक्रॉनचा व्हेरिएंट अधिक वेगाने पसरुन मोठ्या प्रमाणात नागरिकांना बाधित करु शकतो. आईएमएने सांगितले की, जर आपण यावरती तात्काळ उपाय नाही करू शकलो तर आपल्याला तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. यासाठी आरोग्य कर्मचारी आणि रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या नागरिकांना बुस्टर डोस देण्याचे सुचवले आहे.

नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्यूनायझेशन इन इंडिया (NTAGI) च्या झालेल्या बैठकीत बुस्टर डोस संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. तसेच, NTAGI केलेल्या सर्वेत देशाला ओमिक्रॉनचा धोका सर्वाधिक असल्याची बाब समोर आली आहे. तज्ञ्यांच्या मते, ज्या फ्रंट लाइन कर्मचाऱ्यांना आणि जेष्ठ नागरिकांना पहिल्यांदा लसीकरण करुन खुप कार्यकाळ झाला आहे, त्यांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. यासंदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, एनटीएजीआई सध्या WHO च्या निर्देशांची वाट पाहत आहे. त्यानंतर बुस्टर डोसबाबत निर्णय घेतला जाईल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT