covid test Team eSakal
देश

Omisure kit : ओमिक्रॉनचं निदान करणाऱ्या कीटला ICMR कडून मंजूरी

वाढत्या ओमिक्रॉन रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सुधीर काकडे

देशात ओमिक्रॉनचं संकट वाढत असताना आता आयसीएमआरने आज ओमिशुअर या कीटला (Omisure kit) मंजूरी दिली आहे. ओमिशुअर कीटच्या माध्यमातून ओमिक्रॉन व्हेरीअटंची लागण झाली की नाही याचं निदान करता येणार आहे. त्यामुळे आता ओमिक्रॉनचं (Omicron) निदान करण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही.

देशात कोरोनाचा नवीन व्हेरीअंट ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 15 दिवसांत दिल्ली आणि महाराष्ट्रासह ओमिक्रॉनची प्रकरणं झपाट्यानं वाढली आहेत. त्यातच ICMR ने एक मोठा निर्णय घेतला आहे. ICMR ने पहिल्या Omicron डिटेक्शन किटला मान्यता दिली आहे. टाटा मेडिकलने हे कीट तयार केलं आहे. या कीटचं नाव ओमिशुअर असं आहे.

दरम्यान, देशात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ दिसत आहे. भारतात सोमवारी दिवसभरात ३७ हजार ३७९ नवे रुग्ण आढळले. तर ११ हजार ७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. दिलासा देणारी बाब म्हणजे मृतांचा आकडा कमी आहे. गेल्या २४ तासात देशात १२४ जणांनी कोरोमनामुळे प्राण गमावले. सध्या दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा ३.२४ टक्के इतका आहे. देशातील सक्रीय रुग्णांची संख्या १ लाख ७१ हजार ८३० इतकी झाली आहे. तर आतापर्यंत एकूण ३ कोटी ४३ लाख ६ हजार ४१४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोनामुळे आजपर्यंत ४ लाख ८२ हजार १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत गर्जना मोर्चा, मनसैनिक ट्रेनने रवाना; मोदी सरकारवर गंभीर आरोप

काही दिसत नाहीय! 2 मिनिटात १३ हजार फुटांवरून कोसळलं विमान, क्रॅशआधीचा ऑडिओ समोर

Hindu Population Growth : हिंदू तरुणांनी लवकर लग्न करून पाच मुले जन्माला घालावीत; भाजप खासदारच्या वक्तव्याने खळबळ

Raigad: मी टोकाचं पाऊल उचलतोय, घरच्यांना शेवटचा कॉल केल्यानंतर मोबाईल बंद करून...; किल्ले रायगडाच्या टकमक टोकावर काय घडलं?

Nandadevi : हिमबिबट्या अन् ब्लू शीपची भक्कम अन्नसाखळी; ५ हजार मीटर उंचीवर 'सर्सोपाताल'मध्ये शिकारीचा प्रत्यक्ष पुरावा

SCROLL FOR NEXT