देश

Lata Mangeshkar : अयोध्येच्या चौकाला लता दीदींचे नाव, PM मोदींनी दिली जयंतीच्या दिवशी अनोखी भेट

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना जयंती दिनी अभिवादन केले आहे. याचपार्श्वभूमीवर आज अयोद्धेमध्ये चौकाला लता दीदींचे नाव दिले जाणार आहे. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित असणार आहेत.

महान गायिका लता मंगेशकर यांना त्यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी, उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील एका मोठ्या चौकात 14 टन आणि 40 फूट वीणा पुतळा बसवण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी आज या चौकाचे उद्घाटन करणार आहेत. यासोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय पर्यटन मंत्री या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आज स्वर कोकिळा लता मंगेशकर यांची जयंती आहे. यासोबतच राम कथा उद्यानात सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये लता मंगेशकर यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. याप्रसंगी थोर संत महंत व लोकप्रतिनिधींनाही जिल्हा प्रशासनाकडून निमंत्रित करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींनी लता मंगेशकर यांच्या जयंती दिनी अभिवादनपर ट्विट केले आहे, लतादीदींना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. मला खूप काही आठवतंय...असंख्य संभाषणे ज्यात त्यांनी खूप आपुलकीचा वर्षाव केला. आज अयोध्येतील एका चौकाला त्यांचे नाव देण्यात येत आहे, याचा मला आनंद आहे. महान भारतीय व्यक्तिमत्वाला खरी श्रद्धांजली आहे.

1929 मध्ये जन्मलेल्या लता मंगेशकर यांचे या वर्षी 6 फेब्रुवारी रोजी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. 'परिचय', 'कोरा कागज' आणि 'लेकिन'साठी त्यांना तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. देशातील अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT