Reduction in Cylinder Rate sakal
देश

Reduction in Cylinder Rates : मतदानाच्या दिवशी सिलिंडर दरात कपात

लोकसभा निवडणूक निकालापूर्वी आणि अंतिम टप्प्यातील मतदानाच्या दिवशी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात जवळपास ७० रुपयांची कपात झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक निकालापूर्वी आणि अंतिम टप्प्यातील मतदानाच्या दिवशी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात जवळपास ७० रुपयांची कपात झाली आहे. या दरकपातीमुळे आजपासून दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडर ६९.५० रुपयांनी, कोलकत्यात ७२ रुपयांनी, मुंबईत ६९.५० रुपयांनी आणि चेन्नईमध्ये ७०.५० रुपयांनी स्वस्त झाले आहे.

याआधी एप्रिलमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरामध्ये ३०.५० रुपयांची कपात झाल्यामुळे प्रति सिलिंडर दर १७६४.५० रुपये झाले होते. व्यावसायिक ‘एलपीजी’ सिलिंडरची किंमत कमी होण्यामागे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार, कर धोरणातील बदल आणि मागणी ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (एलपीजी) दरवाढीविरोधात विरोधकांनी निवडणूक प्रचारामध्ये सरकारवर टीकेची झोड उठविली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT