captain amrinder singh sakal
देश

सिद्धूच्या राजीनाम्यावर कॅप्टन अमरिंदर सिंग यांची पहिली प्रतिक्रिया

पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

दीनानाथ परब

नवी दिल्ली: पंजाबमध्ये काँग्रेसला (Punjab congress) मोठा धक्का बसला आहे. नवज्योत सिंग सिद्धू (navjot singh sidhu) यांनी तडकाफडकी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. मागच्या काही दिवसांपासून पंजाबमध्ये जोरदार राजकीय घडामोडी पहायला मिळत आहेत. सिद्धू यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग (captain amrinder singh) यांच्याविरोधात राजकीय आघाडी उघडली होती. अखेर काँग्रेसने सिद्धू यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यानंतर काँग्रेसने या राज्यात नेतृत्वबदल करण्याचा मोठा निर्णय घेतला. भाजपाशासित (bjp) राज्यांप्रमाणे पंजाबमध्ये सहजतेने नेतृत्वबदल झाला नाही.

मुख्यमंत्रीपदी चरणजीतसिंग चन्नी यांचं नाव निश्चित होण्याआधी बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यातून पक्षांतर्गत मतभेद समोर आले. काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना राजीनामा द्यायला सांगणे ही मोठी गोष्ट होती. चन्नी यांची मुख्यमंत्रीनिवड झाल्यानंतर आता सर्वकाही सुरळीत होईल, असे वाटत असतानाच सिद्धू यांनी अचानक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात काँग्रेसमधल्या अंतर्गत कुरघोड्यांची चर्चा रंगणार आहे तसेच विधानसभा निवडणुका तोंडावर असलेल्या पंजाबमध्ये काँग्रेसला याचा फटकाही बसू शकतो.

सिद्धू यांच्या राजीनाम्यावर माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मी तुम्हाला म्हणालो होतो...तो स्थिर माणूस नाहीय. पंजाब सारख्या सीमावर्ती राज्यासाठी ह योग्य माणसू नाही" असं कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी टि्वट केलं आहे. अमरिंदर सिंग भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरु असतानाच सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

सिद्धूने राजीनामापत्रात काय म्हटलं आहे...

माणसाचे चारित्र्य कोसळण्याची सुरुवात ही तडजोड करण्यापासून सुरु होते. मी पंजाबच्या भविष्या आणि कल्याणाबाबत तडजोड करु शकत नाही. त्यामुळेच मी पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरुन राजीनामा देतो आहे. मी काँग्रेसची सेवा करत राहीन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT