Viral Video Esakal
देश

Viral Video: एक वर अन् चार वधू... अनोख्या लग्नाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; काय आहे हा प्रकार?

सोशल मिडीयावर अनोख्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

लग्न हे दोन व्यक्तींमधील पवित्र नाते आहे. लग्नबंधनात अडकलेल्या दोन व्यक्ती त्यांचे संपूर्ण आयुष्य एकत्र घालवतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, हा व्हिडिओ एका लग्नाचा आहे. पण हे इतर लग्नांपेक्षा खूप वेगळे आहे. कारण यात एक वर पण चार नववधू आहेत. हा व्हिडीओ पाहून लोक खूप आश्चर्य व्यक्त करत आहेत.(Latest Marathi News)

व्हिडिओमध्ये पांढरा कोट आणि पँट घातलेला वर समोर आहे. लग्नातील फेऱ्यांचे विधी होत आहेत. त्याच्या मागे चार नववधू आहेत. मध्यभागी होम पेटवलेला आहे. आजूबाजूचे लोक त्यांच्यावर फुले फेकत आहेत. समोर एक पंडितही दिसत आहेत. फेरे पूर्ण झाल्यानंतर, सर्व वधू नतमस्तक होतात आणि वराच्या चरणांना स्पर्श करतात.

या व्हिडिओमध्ये किती तथ्य आहे, याबाबत काहीही सांगता येणार नाही. हा व्हिडिओ कुठला आहे याबाबतही काही माहिती अद्याप समोर आलेली नाही. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @musafir_vj नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

हा व्हिडिओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही व्हायरल झाला आहे. व्हिडिओवर लोक मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देत आहेत. एका सोशल मिडीया यूजरने लिहिले की, 'हे फेक आहे, हे घरात केलेलं नाटक आहे, असं कोणी करेल का?' दुसऱ्या सोशल मिडीया युजरने म्हटले की, ' राज्यघटना याला परवानगी देत नाही. असे केल्याने शिक्षा होते'. (Marathi Tajya Batmya)

आणखी एका यूजरने लिहिले आहे की, 'हे खोटे आहे. फक्त रील आहे, दुसरे काही नाही. आतापर्यंत 73 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअरही करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT