One Nation One Election 
देश

One Nation One Election: 'वन नेशन वन इलेक्शन'साठी मोदी सरकारचं पहिलं पाऊल, आज महत्वाची बैठक!

Sandip Kapde

One Nation One Election:  केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली 'वन नेशन, वन इलेक्शन'साठी समिती स्थापन केली आहे. आगामी विशेष अधिवेशनात सरकाय याबाबत विधेयक आणण्याची शक्यता आहे.

दरम्यान 'वन नेशन वन इलेक्शन' समितीची पहिली अधिकृत बैठक आज माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी होण्याची शक्यता आहे. एनआयने ही माहिती दिली आहे.

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काही दिवसांपूर्वी १८ के २२ सप्टेंबरला संसदेचे विशेष अधिवेशनाची घोषणा केली आहे. या पाच दिवसीय अधिवेशनात मोदी सरकार  'वन नेशन, वन इलेक्शन' विधेयक मांडू शकते.

गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा आणि सार्वत्रिक निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या विचारावर भर देत आहेत. कारण असे केल्याने निवडणुका घेण्याचा खर्च कमी होईल आणि वेळेचीही बचत होईल. कोविंद यांच्याकडे जबाबदारी सोपवण्याचा केंद्राचा निर्णय सरकारचे गांभीर्य दर्शवतो. (Latest Marathi news)

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यानंतर पुढील वर्षी मे-जूनमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT