One Nation One Election 
देश

One Nation, One Election: 'एक देश, एक निवडणूक'साठी हालचालींना वेग; 'या' दिवशी होणार समितीची पहिली बैठक

माजी राष्ट्रपती आणि समितीचे अध्यक्ष रामनाथ कोविंद यांनी ही माहिती दिली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

One Nation, One Election: 'एक देश, एक निवडणूक' धोरणाच्या हालचालींना आता वेग आला आहे. कारण यासाठी नेमलेल्या समितीची पहिली बैठक निश्चित झाली असून याची तारीखही समोर आली आहे. त्यानुसार, याच महिन्यात ही बैठक पार पडणार आहे. (One Nation One Election committee first meeting will be held on 23 September 2023)

कोविंद यांची माहिती

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली 'एक देश, एक निवडणूक' या धोरणाच्या पडताळणीसाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक २३ सप्टेंबर २०२३ रोजी पार पडणार आहे, अशी माहिती स्वतः कोविंद यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. (Latest Marathi News)

समितीत कोण?

वन नेशन, वन इलेक्शन समितीची अधिसूचना केंद्र सरकारनं जाहीर केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे असतील. तसेच गृहमंत्री अमित शहा, लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, गुलाम नबी आझाद, एन के सिंह, सुभाष सी कश्यप, हरीश साळवे, संजय कोठारी यांचाही या समितीत समावेश आहे. (Marathi Tajya Batmya)

समिती नेमकं काय करणार?

समिती 'वन नेशन, वन इलेक्शन' अर्थात देशभरातील सर्व निवडणुका जसं लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदा, महापालिका, पंचायत समिती आदी निवडणुका एकाच वेळी घेता येणं शक्य आहे का? याचा अभ्यास आणि पडताळणी करणार आहे. यासाठी ही समिती देशातील सर्व राज्यांचा दौरा करुन याबाबत लोकजागृती तसेच लोकांचं म्हणणं ऐकून घेतील. तसेच विविध राजकीय पक्षांशी देखील ही समिती सल्लामसलत करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT