One Nation One Election esakal
देश

One Nation One Election : वन नेशन वन इलेक्शनचा अंदाज ? २ ऑक्टोबरला जाहीर होणार इंडियाचा किमान समान कार्यक्रम!

काही राज्यांच्या निवडणुका लांबवून काहींच्या आधी लोकसभेसमवेत घेणे भाजपला फायद्याचे आहे काय यावर चर्चा झाली. मात्र...

- मृणालिनी नानिवडेकर

One Nation One Election Update- संसदेच्या विशेष अधिवेशनात मूदतपूर्व लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू शकतात ही शक्यता गृहित धरत इंडियाने जागावाटपाची चर्चा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

गांधीजयंतीच्या दिवशी इंडियाचा किमान समान कार्यक्रम घोषित केला जाईल असेही ठरल्याचे समजते. महाराष्ट्रासह काही राज्यात लवकरच मुदतपूर्व निवडणुका होवू शकतील हे लक्षात घेत तयारी सुरु केली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरु असलेली भारताची अधोगतीकडची वाटचाल रोखण्याचा संकल्प इंडिया बैठकीसाठी एकत्र आलेल्या भाजपविरोधी पक्षांनी केला आहे.

आज घोषित करण्यात आलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात मुदतपूर्व लोकसभा निवडणुकांची घोषणा होणार काय यावर आज बैठकीला हजर झालेल्या सर्व प्रमुख पक्षांनी चर्चा केली असून गांधीजयंतीच्या मुहुर्तावर २ ऑक्टोबर रोजी संयुक्तरित्या लढवू शकू अशा किमान २०० मतदारसंघांची घोषणा करण्याचा प्रस्ताव प बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अनौपचारिक बैठकीत ठेवला आहे.

भाजपला पराभूत करण्याच्या दिशेने पावले टाकण्यासाठी राज्याराज्यात घटक पक्षांच्या सुकाणू समित्या स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. उद्या ता १ रोजी होणार्या बैठकीत १० ते २० सदस्यांची समन्वय समिती नेमली जाण्याची शक्यता आहे.संयोजकपदावर कुणाला नेमले जावे काय यावरही खल होण्याची शक्यता आहे.

संसदेच्या विशेष अधिवेशनात नेमके काय होणार या प्रश्नावर इंडिया आघाडीत आज वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात होते.एक देश एक निवडणूक अशी घोषणा होईल काय या शक्यतेचा सर्वाधिक विचार झाला असे समजते.

काही राज्यांच्या निवडणुका लांबवून काहींच्या आधी लोकसभेसमवेत घेणे भाजपला फायद्याचे आहे काय यावर चर्चा झाली. मात्र असा निर्णय घेत हातातील सत्ता घालवण्याचा निर्णय घेण्याच्या निर्णयाचे पर्यवसान पराभवात होवू शकते.

सत्ता जाणे चालेल काय यावरही बैठकीत काथ्याकूट झाला.कुणाच्या बाजूने निकाल लागेल याचे अंदाजही व्यक्त केल्याचे सांगण्यात येते.

या अनौपचारिक चर्चेला सोनिया आणि राहुल गांधी ,मल्लिकार्जुन खरगे ,शरद पवार ,उध्दव ठाकरे ,नितीशकुमार ,अरविंद केजरीवाल ,एम.के.स्टालीन अशी बहुतांश बडी मंडळी हजर होती.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT