Forest Department Chikkodi  esakal
देश

Belgaum Crime : विषारी धान्य खायला घालून 11 मोरांची हत्या; वीटभट्टीतील कामगाराला अटक, हत्येत आणखी कोणाचा सहभाग?

मांजरी येथे शनिवारी कृष्णाकाठ परिसरात तब्बल अकरा मृत मोर सापडले होते.

सकाळ डिजिटल टीम

लवकरात लवकर या प्रकरणी अन्य कोण सहभागी आहेत, त्यांनाही वनविभागाच्या कायद्यान्वये अटक करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.

मांजरी : विषारी आहार देऊन मोरांची (Peacocks) हत्या केल्याप्रकरणी मांजरी येथे वीटभट्टीवर कामासाठी आलेल्या एका संशयिताला वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद केले. मंजुनाथ पवार (वय २७, रा. झळकी, ता. अफजलपूर, जि. गुलबर्गा) असे संशयिताचे नाव आहे. शासकीय इतमामात या मोरांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत माहिती अशी, मांजरी येथे शनिवारी कृष्णाकाठ परिसरात तब्बल अकरा मृत मोर सापडले होते. या मोरांना कोणीतरी विषारी धान्य खायला घालून हत्या केल्याचा संशय वन खात्याच्या (Forest Department) अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार तपास केला असता व गावातून माहिती घेतली असता एका वीटभट्टीतील कामगाराला अटक केली.

त्याने या मोरांना विषारी औषधे खायला घातल्याची कबुली दिली असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास बेळगाव जिल्हा वनाधिकारी सुनीता निंबरगी करत आहेत.

बेळगाव जिल्हा वनाधिकारी सुनीता निंबरगी म्हणाल्या, मांजरी (ता. चिक्कोडी) येथे राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांची हत्या केल्याची घटना ही निंदणीय आहे. या प्रकरणात अन्य कोणी सहभागी आहेत, त्यांचा कसून तपास सुरू आहे.

लवकरात लवकर या प्रकरणी अन्य कोण सहभागी आहेत, त्यांनाही वनविभागाच्या कायद्यान्वये अटक करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. मृत झालेल्या सर्वच मोरांवर मांजरी येथील पशुवैद्यकीय अधिकारी विनायक पाटील यांनी शवविच्छेदन करून शासकीय इतमामानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

SCROLL FOR NEXT