Jammu Sunjwan Encounter e sakal
देश

जम्मूतील सुंजवानमध्ये चकमक; एका जवानाला वीरमरण, ४ जखमी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील जलालाबाद सुंजवान (Jammu Sunjwan Encounter) भागात शुक्रवारी पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यामध्ये सुरक्षा दलाच्या एका जवानाला वीमरण आले असून इतर चार जण जखमी आहे. चकमक अजूनही सुरूच आहे.

जलालाबाद सुंजवान भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी या भागाला वेढा घातला. मध्यरात्री सुरू झालेली ही चकमक शुक्रवारी सकाळपर्यंत सुरूच आहे. यामध्ये सीआयएसएफचे एएसआय एसपी पटेल यांना वीरमरण आले. तसेच चार जवान जखमी झाले आहेत, असं जम्मूचे एडीजीपी मुकेश सिंग यांनी सांगितलं. तसेच जैश-ए-मोहम्मद (JeM) चे तब्बल दोन दहशतवादी जाळ्यात सापडले आहेत. जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफने ही संयुक्त कारवाई केली आहे.

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत कठुआचे पोलिस हेड कॉन्स्टेबल बलराज सिंह, अखनूरचे एसपीओ साहिल शर्मा, ओडिशाचे सीआयएसएफचे परमोद पात्रा आणि आसामचे अमीर सोरण हे जखमी झाले आहेत. दरम्यान, या चकमकीमुळे जम्मूच्या काही भागात मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT