One Nation One Product eSakal
देश

One Nation One Product : देशातील 1,037 रेल्वे स्थानकांवर पोहोचली 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट' योजना; काय होतोय फायदा?

OSOP Scheme : गेल्या वर्षी या योजनेची सुरुवात करण्यात आली होती.

Sudesh

रेल्वेची वन स्टेशन वन प्रॉडक्ट ही योजना आता देशातील तब्बल 1,037 रेल्वे स्थानकांवर सुरू करण्यात आली आहे. स्थानिक उत्पादने विक्रीला चालना मिळण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. गेल्या वर्षी या योजनेची सुरुवात करण्यात आली होती.

या योजने अंतर्गत स्थानिक विक्रेत्यांना आपली उत्पादने विकण्यासाठी रेल्वे स्थानकांवर विशिष्ट आउटलेट दिले जातात. स्थानिक कारागीर, शिल्पकार आणि कामगारांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो आहे. यामुळे स्वदेशी उत्पादनांना देखील चालना मिळत आहे.

तामिळनाडू प्रथम क्रमांकावर

देशातील 1,037 रेल्वे स्थानकांवर मिळून 1,134 आउटलेट सुरू आहेत. तामिळनाडू राज्यामध्ये 137 रेल्वे स्थानकांवर 146 OSOP आउटलेट आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगाल (123 आउटलेट) आणि तिसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश (112 आउटलेट) आहे.

ही योजना अगदी वेगाने देशभरात पसरत आहे. लवकरच देशातील इतर स्थानकांवर देखील अशी दुकानं पहायला मिळतील. स्वदेशी उत्पादने विकण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं या उद्देशाने रेल्वे स्थानकांवर ही आउटलेट्स उभारण्यात येत आहेत. (National News)

9 नोव्हेंबर (2023) पर्यंत देशातील 39,847 प्रत्यक्ष लाभार्थींनी या योजनेचा फायदा मिळवला आहे. प्रत्येक आउटलेटमागे किमान पाच अप्रत्यक्ष लाभार्थी पकडले, तरी एकूण 1,43,232 लाभार्थ्यांना याचा फायदा झाला आहे, असं आपण म्हणू शकतो. एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

Gen Z Fashion Trends 2026: आउटडेटेड झालेल्या वायर इअरफोनच्या प्रेमात Gen Z, फॅशनमध्ये का परतला रेट्रो टच?

SCROLL FOR NEXT