One terrorist killed in Awantipora encounter 
देश

काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांसोबत चकमक; एक दहशतवादी ठार

वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा आज (ता. २६) सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांसोबत चकमक झाली आहे. जम्मू काश्मीरमधील त्रालमध्ये ही चकमक झाली आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, पोलिसांच्या संयुक्त पथकाने दहशतवादी लपले असलेल्या भागात घेराव घातला त्यावेळी, दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. त्यानंतर सेनेकडून प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारानंतर झालेल्या चकमकीत एक जण ठार झाला आहे. दरम्यान, काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या यावर्षात १०८वर पोहचली आहे. तर केवळ जून महिन्यात ३७ दहशतवादी मारले गेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

पुलवामा जिल्ह्यातील अवंतिपुरा क्षेत्रातील चेवा उलर, त्रालमध्ये ही चकमक झाली असून सर्च ऑपरेशन सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यापूर्वीही गुरुवारी त्रालमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. जम्मू-काश्मीर पोलिसांना एका गावात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिस, 42 आरआर आणि सीआरपीएफ कार्डन यांच्या पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली होती. तत्पूर्वी, सकाळी सोपोर जिल्हातील बारामुल्लामध्ये एका गावात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senior Citizens Property Rights : सून सासू-सासऱ्यांच्या घरात राहू शकते, पण मालकी हक्क मिळणार नाही; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Shilpa Shinde : 'हाय दैय्या!' शिल्पा शिंदे परतणार? 'अंगुरी भाभी' म्हणून 8 वर्षांनंतर पुनरागमन

Nanded News: खूनप्रकरणी बाप-लेक अटकेत; तरुणाचा खून करून विहिरीत फेकले

Mahabaleshwar News: लोकसहभागातून सुटेल मानव- वन्यजीव संघर्ष; महाबळेश्वर तालुक्यातील १०५ गावांची बैठ, वन विभागासोबत चर्चा

'मी कधीही पुरस्कार विकत घेतले नाही' ट्रोलर्संना अभिषेकचं उत्तर, म्हणाला...'मी मेहनतीनं सन्मान मिळवलाय '

SCROLL FOR NEXT