Jammu and Kashmir one Terrorists Killed esakal
देश

जम्मू काश्मिरात एका दहशतवाद्याचा खात्मा; ऑपरेशन चालूच

रात्री उशीरा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक चालू झाली होती.

सकाळ डिजिटल टीम

जम्मू : जम्मू काश्मिरमधील कुलगाम जिल्ह्यातील खांडीपोरा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमकी चालू आहेत. त्यामध्ये एका दहशतवाद्यांचा खात्मा सुरक्षा दलांकडून करण्यात आला आहे. रात्री उशीरा ही चकमक चालू झाली होती. पोलिस आणि सुरक्षा दलांकडून अजूनही दहशतवाद्यांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

(1 Terrorist Killed In kashmir)

दरम्यान काश्मिरातील बडगाम आणि कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या हालचाली वाढत आहेत. अनेक दिवसांपासून काश्मिरात टार्गेट किलिंग चालू असताना दहशतवाद्यांच्या कारवाया वाढत आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी काश्मिरी पंडितांच्या लक्ष्य करून हत्या करण्यात येत होत्या. त्यानंतर काश्मिरातून पंडितांनी स्थलांतर करायला सुरूवात केली होती.

मागच्या काही दिवसांपासून काश्मिरात हिंदूंना लक्ष्य करून त्यांच्या हत्या करण्यात येत आहेत. त्यामुळे अस्थिरता निर्माण झाली आहे. राहुल भट्ट नावाच्या एका सरकारी कर्मचाऱ्याची कार्यालयात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यावर पंडितांनी निदर्शने केले होते. त्यानंतर एका शिक्षिकेची आणि पोलिस कर्मचाऱ्यांची घरात घुसून हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून काश्मिरात तणाव निर्माण झाला आहे.

या तणावपूर्ण वातावरणातही दहशतवाद्यांच्या कारवाया थांबताना दिसत नाहीत. रात्रीपासून चालू असलेल्या या कारवाईत एका दहशतवाद्याच्या खात्मा करण्यात आला असून कारवाई चालू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी भारतात आला होता कसाब? उज्ज्वल निकमांचा धक्कादायक दावा, म्हणाले...

Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरे दुष्काळ दौरा भेटीसाठी परभणी दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT