lockdown 4.jpg 
देश

लॉकडाउनमुळे टळला मोठा अनर्थ; २५ लाखांहून अधिक झाले असते मृत्यू

दीनानाथ परब

काल बुधवारी २४ मार्चला देशव्यापी लॉकडाउनला एकवर्ष पूर्ण झालं. संपूर्ण भारतात फक्त ५२५ कोरोना रुग्ण संख्या असताना देशात कठोर लॉकडाउनची अमलबजावणी सुरु झाली. सुरुवातीलच कोरोना व्हायरसची साखळी तोडण्याच्या उद्देशाने हा लॉकडाउन करण्यात आला होता. पण ही साखळी तुटली नाही, उलट रुग्ण संख्या वाढतच गेली. आज देशाच्या काही भागांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. १५ मार्च २०२० ला  देशात कोरोना रुग्णांची संख्या १०० च्या पुढे गेली. २९ मार्चला देशात कोरोनाचे १ हजार रुग्ण होते. पुढच्या दोन आठवडयात १३ एप्रिलपर्यंत देशभरात कोरोना रुग्णांची संख्या १० हजारच्या पुढे गेली होती. 

पण त्यानंतर लॉकडाउनचा परिणाम दिसून आला. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच होती. पण ही वाढत तितकी धोकादायक आणि घातक नव्हती. भारतात लॉकडाउनचा नेमका काय परिणाम झाला? त्याचे किती फायदे आणि तोटे झाले? त्याचा अभ्यास वेगवेगळया संस्थांनी केला आहे. आयआयटी हैदराबादचे प्राध्यापक एम. विद्यासागर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या सरकारी समितीच्या अंदाजानुसार, लॉकडाउन केला नसता, तर जून अखेरीस अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ५० लाखाच्या घरात असती. 

पण प्रत्यक्षात जून अखेरीस अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ६ लाखापेक्षा कमी होती. सप्टेंबरमध्ये देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर वाढत असताना, अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या फक्त १० लाख होती. लॉकडाउन लावला नसता, तर देशात २६ लाखापेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला असता, असा अंदाज  एम. विद्यासागर यांच्या समितीने वर्तवला आहे. लॉकडाउन आणखी महिनाभर उशिराने मे महिन्यात लावला असता, तर दहा लाखापेक्षा जास्त मृत्यू झाले असते. लॉकाडउनच्या वर्षभरानंतर आज देशात कोरोनामुळे १.६ लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जगात सर्वात कमी मृत्यूदर भारतात आहे. भारतात लॉकडाउन एकूण चार फेजमध्ये होता. पहिला फेज २४ मार्चला आणि दुसरा फेज ३० एप्रिलपासून होता. या दोन फेजमध्ये निर्बंध अत्यंत कठोर होते. या दरम्यान रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक पूर्णपणे बंद होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT