one year old girl miraculously escapes unhurt as train runs over at mathura
one year old girl miraculously escapes unhurt as train runs over at mathura 
देश

खिसा कापला, धक्का लागला अन् ती रुळावर पडली...

वृत्तसंस्था

लखनौ:  चोरट्याने खिसा कापला, दुसऱया प्रवाशाचा धक्का लागला अन् तिच्या कडेवरील चिमुकली रेल्वे रुळावर पडली. धाड-धाड करत रेल्वे रुळावरून गेली. सर्वांना धस्स झाले. पण, चिमुकली रेल्वे रुळाच्या मध्यभागी शांतपणे पडून राहिल्याने तिला साधे खरचटलेही नाही. 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय मथुरात घडलेल्या एका घटनेमुळे आला आहे.

मथुरा रेल्वे स्टेशनवर सोनू नावाच्या प्रवाशाचा खिसा चोरट्याने कापला. त्याचवेळी त्याच्या पत्नीला दुसऱ्या प्रवाशाचा धक्का लागला आणि तिच्या कडेवरील चिमुरडी हातातून निसटून प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि रुळांच्या मध्ये पडली. तिला उचलण्याच्या आतच भरधाव रेल्वे रुळावरुन धडधडत गेली. काही क्षण प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांच्या काळजात धस्स झाले. मात्र, रेल्वे निघून जाताच प्रवाशांनी तिच्या दिशेने धाव घेतली. सुदैवाने तिला साधे खरचटलेही नव्हते.

आपली चिमुकली सुखरुप असल्याचं पाहून आईलाही भाराहून आले. तिने लेकीला उचलून घेत कवटाळले. हा क्षण अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. साहिबा असं या एक वर्षांच्या मुलीचं नाव आहे. साहिबाच्या अंगावरून रेल्वे गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. साहिबाचे नशीब बलवत्तर यामुळेच ती जीवंत राहू शकली, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT