online application process started for General Duty recruitment in Army for women 
देश

महत्वाची बातमी : सैन्य दलात महिलांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू; असा करा अर्ज

अक्षता पवार

पुणे : भारतीय सैन्य दलात महिलांच्या 'जनरल ड्युटी' (महिला सैन्य पोलिस) भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य असून अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. याबाबतचे सूचना पत्र नुकतेच सैन्य दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

तर प्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आलेल्या महिला उमेदवारांना रॅलीची प्रवेश पत्रे नोंदणीकृत ई-मेलद्वारे पाठविली जातील. तसेच प्रवेश पत्रात दिलेल्या तारखेला आणि वेळेवर उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी हाजर राहणे आवश्यक आहे. तर यावेळी 99 जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार असून ती पुणे, अंबाला, लखनऊ, जबलपूर, बेंगळुरू आणि शिलॉंग येथे पार पडणार आहे. उमेदवारांना त्यांच्या मूळ जिल्ह्यांच्या आधारे भरती प्रक्रियेची जागा देण्यात येणार आहे. 

दरम्यान या भरती प्रक्रियेसाठी काही ठराविक पात्रता निकष देण्यात आले आहेत. तर या संबंधित अधिक माहिती तसेच ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमधील गँगस्टर करनजीत गुग्गाला दिल्लीत अटक

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT