bharat biotech 
देश

'लहानग्यांना आमचीच लस द्या, कारण...'; भारत बायोटेकचं आरोग्य कर्मचाऱ्यांना आवाहन

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतात कोरोना लसीकरणाची मोहिम गतीने सुरु आहे. सध्या भारतातील 15 ते 18 वयोगटातील मुलांनाही कोरोनाची लस दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर भारत बायोटेक या स्वदेशी लस निर्मिती करणाऱ्या कंपनीने एक महत्त्वाची बाब निदर्शनास आणून दिली आहे. या वयोगटातील मुलांना केवळ कोव्हॅक्सिन (Covaxin) हीच लस मान्यता प्राप्त असून त्याव्यतिरिक्त लशीचा डोस देखील देण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत बायोटेकने (Bharat Biotech) हे आवाहन केलं आहे.

भारत बायोटेकने (Bharat Biotech) आरोग्य कर्मचाऱ्यांना उद्देशून एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. 15-18 वयोगटातील लोकांना भारतात मंजूर नसलेल्या कोविड लस (COVID vaccines) देण्यात येत असल्याचं निदर्शनात आणत भारत बायोटेकने म्हटलंय की, "आरोग्य सेवा कर्मचार्‍यांना विनंती करण्यात येत आहे की, केवळ 15-18 वयोगटातील व्यक्तींनाच COVAXIN दिले जाईल, याची खात्री करावी".

भारत बायोटेकने म्हटलंय की, आम्हाला अनेक व्यक्तींचे असे अहवाल प्राप्त झाले आहेत ज्यामध्ये 15-18 वर्षे वयोगटाला मान्यता नसलेली कोरोना लस दिली जात आहे. आम्ही आरोग्यसेवा कर्मचार्‍यांना नम्रपणे विनंती करतो की, त्यांनी अत्यंत सतर्क राहावे आणि केवळ 15-18 वयोगटातील व्यक्तींनाच COVAXIN लसच दिली जाईल, याची खात्री बाळगावी.

2-18 वयोगटातील मुलांची सुरक्षितता आणि रोगप्रतिकारक शक्ती याचा आढावा घेऊनच संपूर्ण क्लिनिकल चाचणीच्या मूल्यांकनाच्या आधारे COVAXIN ला मान्यता मिळाली आहे. सध्या भारतात मुलांसाठी मंजूर झालेली ही एकमेव COVID-19 लस आहे. महामारीच्या काळात आमच्या आरोग्यसेवा कर्मचार्‍यांनी आमच्या देशासाठी केलेल्या उत्तम सेवेबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT