Prashant Kishore esakal
देश

प्रशांत किशोर यांचा निवडणूक आयोगाला सल्ला; म्हणाले, 'कोरोना असताना....'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : येत्या काही दिवसांवरच पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता भारतीय निवडणूक आयोग (Election Commission of India - ECI) या पाच राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. याच्या काही दिवस आधीच, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी आज शुक्रवारी ट्विटरवर एक महत्त्वाचं विधान केलं आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला एक सल्ला दिला आहे. मतदान पार पाडण्यासाठी त्यांनी 'एकमेव सुरक्षित मार्ग' सांगितला आहे. एकीकडे देशात कोरोना रुग्णांची (Covid-19 infections) संख्या पुन्हा वाढीस लागलेली असताना त्यांनी या पार्श्वभूमीवर पाच राज्यांतील निवडणुकांसंदर्भात निवडणूक आयोगाला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

“निवडणूक आयोगाने या पाच राज्यांमध्ये किमान 80% लोकांसाठी लसींच्या दोन्ही डोसचा आग्रह धरला पाहिजे. या भयंकर महामारीच्या काळात निवडणूक घेण्याचा हाच एकमेव सुरक्षित मार्ग आहे. कोरोना सुयोग्य वर्तनासाठी मार्गदर्शक तत्त्वे असूनही जर त्याचं अनुसरण केलं जाणार नसेल तर ती गोष्ट हास्यास्पद आहे,” असं किशोर यांनी ट्विटरव म्हटलंय.

एकीकडे निवडणूक पॅनेलने त्यांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच संबंधित राज्यांमधील कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी या राज्यांना भेटी दिल्या आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवरच आता किशोर यांचं हे ट्विट समोर आलंय. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) सुशील चंद्र यांच्या नेतृत्वाखाली अधिकार्‍यांनी, निवडणुका होणार्‍या पाच राज्यांपैकी एक असलेल्या उत्तर प्रदेशला भेट दिली होती आणि प्रमुख राजकीय पक्षांशी सल्लामसलत केली होती. उत्तर प्रदेश व्यतिरिक्त, गोवा, मणिपूर, पंजाब आणि उत्तराखंड या चार राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असून राजकीय पक्षांनी मात्र सभा घेण्याचा सपाटा सुरुच ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT