देश

कर्नाटकात सरकारकडून ‘ऑपरेशन युती’

सकाळवृत्तसेवा

बंगळूर - कनकगिरी विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार बसवराज दडेसगुरू यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. त्यामुळे, राज्याच्या राजकारणात मोठे औत्सुक्‍य निर्माण झाले आहे. सरकारने ‘ऑपरेशन युती’ तर सुरू केले नाही ना, अशी चर्चा सुरू आहे.

भाजपने ऑपरेशन कमळच्या माध्यमातून काँग्रेसच्या असंतुष्ट आमदारांना आपल्या जाळ्यात अडकविण्याचा व राज्यातील युती सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस-धजद युतीच्या नेत्यांनीही भाजपच्या काही आमदारांना ऑपरेशन युतीच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमदार बसवराज दडेसगुरू यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. यावरून भाजपचेही काही आमदार युतीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले.

असंतुष्ट आमदारांची नाराजी दूर करण्याबरोबरच राज्यातील युती सरकार भक्कम करण्यासाठी भाजपच्या काही आमदारांना आपल्या जाळ्यात अडकविण्याचे प्रयत्न युतीतील दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी चालविले आहेत. भाजपचे पाच ते सहा आमदार युतीच्या संपर्कात असल्याचे समजते.

मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याशी चर्चा केलेले आमदार बसवराज दडेसगुरू भाजप  प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय असल्याचे समजते. त्यांनी अर्ध्या तासाहून अधिक वेळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आमदार बसवराज भाजपचा व आमदारपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे.

रमेश जारकीहोळींबद्दल नाराजी
कुमारस्वामी व सिध्दरामय्या यांनी शनिवारी (ता. १) सायंकाळी एकत्र येऊन विद्यमान राजकीय घडामोडीवर चर्चा केली. रमेश जारकीहोळी यांची कितीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरी ते आपला हट्ट सोडण्यास तयार नाहीत. यासाठी त्यांना वगळून इतर असंतुष्टांचे मनपरिवर्तन करण्यावर भर देण्याचा निर्णय युतीने घेतला आहे. त्यानुसार काही असंतुष्ट आमदारांची नाराजी दूर झाल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Lok Sabha: उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून दोन उमेदवारांची चर्चा

SCROLL FOR NEXT