देश

युक्रेनमधून आज 2,135 भारतीयांना काढलं बाहेर; नागरी उड्डाण मंत्रालयाची माहिती

युक्रेनच्या शेजारील देशांमधून ही बचाव मोहिम राबवण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये (Ukraine War) अडकलेल्या भारतीयांपैकी आज २१३५ भारतीयांना ऑपरेशन गंगा (Operation Ganga) अंतर्गत बाहेर काढण्यात आलं आहे, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्रालयानं (Ministry of Civil Aviation) दिली आहे. युक्रेनच्या शेजारील देशांमधून ११ विशेष विमानांद्वारे या भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. (Operation Ganga 2135 Indians evacuated from Ukraine today Ministry of Civil Aviation)

ऑपरेश गंगा ही मोहिम युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी संजीवनी ठरली आहे. या मोहिमेद्वारे २२ फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या या विशेष मोहिमेंतर्गत विशेष विमानांद्वारे आजवर १५,९०० भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यात आलं आहे.

दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या 'ऑपरेशन गंगा' मोहिमेचा शेवटचा टप्पा आजपासून सुरु झाला आहे. यापार्श्वभूमीवर भारतीय दुतावासानं युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना लवकरत हंगेरीया सिटी सेंटर, राकोझी युटी ९० आणि बुडापेस्ट या शहरांमध्ये पोहोचण्याचं आवाहन केलं आहे.

हजारो विद्यार्थी अद्यापही युक्रेनच्या पूर्वभागातील कॉन्फ्लिक्ट झोनमध्ये अडकून पडले आहेत. अशा भारतीयांना बाहेर काढण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या भारतीयांना बाहेर काढणं हे सध्या सर्वात मोठं आव्हान असल्याचं भारत सरकारनं शुक्रवारी म्हटलं होतं. युक्रेनमधून सध्या 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत १३,३०० भारतीय नागरिकांना ६३ विमान फेऱ्यांच्या मदतीनं मायदेशी आणण्यात आलं आहे. यांपैकी गेल्या चोवीस तासात १५ विमानं २,९०० भारतीयांना घेऊन भारतात पोहोचली आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं शनिवारी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT