Operation Jatayu Forest Department's efforts to bring back vultures sakal
देश

Vultures : फणसाडमध्ये ‘ऑपरेशन जटायू’

गिधाडांच्या पुनरागमनासाठी वनविभागाचे प्रयत्‍न

मेघराज जाधव

मुरुड : रायगड जिल्ह्यातील जैव विविधतेने नटलेल्या फणसाड अभयारण्यात पशू-पक्ष्यांबरोबरच विविध प्रजातींच्या अनेक वनस्‍पतींचा ठेवा आहे. काही वर्षांपूर्वी पांढऱ्या पाठीचे ६० ते ७० गिधाडांचे अस्तित्व अभयारण्यात होते. मोकळ्या जागेत गिधाडांच्या खाद्यासाठी आहार केंद्र ही तयार करण्यात आले होते. २०१५ नंतर ते बंद झाले. गाय, म्हैस वा बैल मृत झाल्यानंतर पंचक्रोशीतील ग्रामपंचायत हद्दीतून कळवण्यात आल्‍यावर मृत जनावरे खाद्यान्न म्हणून आणले जायचे. गिधाडांचे पुनरागमन फणसाड अभयारण्यात व्हावे म्‍हणून वन अधिकाऱ्यांनी ऑपरेशन ‘जटायू’ सुरू केले आहे.

अभयारण्याने २०२१ मध्ये ग्रीन वर्क्स ट्रस्ट (जीडब्लूटी) या सामाजिक संस्थेच्या सहयोगाने केलेल्‍या सर्वेक्षणात, गिधाडांचा हवाई प्रवास सुमारे १०० कि.मी. परिघात असल्याची माहिती समोर आली आहे. गिधाडांचे त्यांच्या नवीन अधिवासापासून ३८ किमी अंतरावर उलटे स्थलांतर सुरू करण्याचे उद्दिष्ट फणसाड अभयारण्य परिक्षेत्राने ठेवले आहे. गिधाडांना खाण्यासाठी मृत गाय, बैल, म्हैस ही जनावरे ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

राखीव वनाचा दर्जा

फणसाड अभयारण्य रायगड जिल्ह्यातील मुरूड व रोहा तालुक्यात येते. महाराष्ट्र सरकारने १९८६ मध्ये राखीव वनाचा दर्जा दिला. अभयारण्याचे क्षेत्रफळ ६९.७९ चौरस किलोमीटर असून ते काशीद, कोकबन, चिकनी, दांडा, नांदगाव, बारशिव, मजगाव, वळास्ते, सर्वा, सुपेगाव अशा एकूण ३८ गावांनी वेढले आहे. पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगेत अभयारण्य येते.

गिधाड आहार केंद्राचे उद्दिष्ट

अभयारण्य परिसरात १९९० पासून गिधाडांचे अस्‍तित्‍व आढळले. तथापि, पर्यटकांची वाढती संख्या, अन्नाची कमतरता आणि अन्नातील भेसळ आदी कारणांनी गिधाडांनी अधिवास सोडल्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे. त्‍यांचे अभयारण्यात पुनरागमन व्हावे, यासाठी २०१५ पासून बंद पडलेले गिधाड आहार केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

विविध प्रजातींचे पक्षी

अभयारण्यात ब्राह्मणी घार, घुबड, तुरेवाला सर्पगरूड, ससाणा, सफेद पाठीची गिधाडे, सातभाई, बुलबुल, हळद्या, तांबट, समुद्र गरूड इत्यादी पक्षी वास्तव्यास आहेत.

नऊ महिन्यांत ‘व्हल्चर रेस्टॉरंट’मध्ये डझनाहून अधिक मृत जनावरे ठेवण्यात आली आहेत. यावेळी गिधाडे आकाशात घिरट्या घालताना दिसली, मात्र ती खाली उतरले नाहीत. श्रीवर्धन, म्हसळा आणि महाड तालुक्यामध्ये गिधाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. आतापर्यंत सुरू केलेल्या जागरूकता कार्यक्रमांना अद्याप यश आलेले नाही, मात्र आम्‍ही आशावादी आहोत.

- तुषार काळभोर, वनपरिक्षेत्र अधिकारी

अभयारण्यात गिधाड आहार उभारण्यात आले आहे. कर्मचारी व ग्रीन वर्क्स ट्रस्टच्या सहकार्याने हे केंद्र पुन्हा सुरू झाले आहे.

- नंदकिशोर कुप्टे, वन्यजीव सहायक संरक्षक, फणसाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT